नाशिकला दिवसभरात दोनदा भूकंपाचे धक्के

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

नाशिक - नाशिक शहर व परिसरात आज दिवसभरात दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अनुक्रमे 25 आणि 42 सेकंदांपर्यंत हे धक्के जाणवल्याची नोंद भूकंप मापन केंद्रात झाली आहे. नाशिक शहर व लगतच्या आठ किलोमीटर परिसरात सकाळी 9 वाजून 54 मिनिटांनी पहिल्या धक्‍क्‍याची नोंद झाली. साधारण 28 सेकंदाच्या या धक्‍क्‍याची शहरालगतच्या आठ किलोमीटर परिघापर्यंत 1.9 रिश्‍टर स्केल तिव्रता नोंदली गेली. त्यानंतर दुपारी पावणे बाराला दुसरा धक्का जाणवला. त्याची तिव्रता 2.2 रिश्‍टर स्केल, तसेच शहर परिसर आणि लगतच्या 20 किलोमीटरपर्यंत त्याचे पडसाद होते. दुसरा धक्का साधारण 42 सेकंदापर्यंत हादरे देणारा होता.
Web Title: earthquake in nashik