'चेतक'मध्ये घोड्याला अकरा लाखांचा भाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

सारंगखेडा (ता. शहादा) - महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या एकमुखी दत्त यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. यात्रेत आज "चेतक फेस्टिव्हल'चे उद्‌घाटनही करण्यात आले. पहिल्या दिवशी एका घोड्याला लाख-दोन लाख नव्हे, तर तब्बल अकरा लाख रुपये भाव मिळाला. महोत्सवामध्ये आतापर्यंत 160 घोडे विकण्यात आले असून, त्यातून 40 लाखांची उलाढाल झाली आहे.

दत्त मंदिरात आज पहाटे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी दर्शनाला गर्दी केली होती. सकाळी नऊच्या सुमारास आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून "चेतक फेस्टिव्हल'चे उद्‌घाटन झाले. "चेतक फेस्टिव्हल'च्या माध्यमातून होणाऱ्या विविध उपक्रमांसाठी एक कोटी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून विकास कामांबरोबरच सांस्कृतिक कामे होतील, असे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.