पाडळसेत शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

यावल - पाडळसे (ता. यावल) येथील राजेंद्र धर्मराज भिरूड (वय 49) या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 5) रात्री उशिरा घडली. मूळ शिरसाड येथील रहिवासी असलेले भिरूड हे काही वर्षांपासून पाडळसे येथे वास्तव्यास आहेत. शेतात गुरांची वैरण साठविण्यासाठी कुंड बांधण्याचे काम ते काल दिवसभर करीत होते. घरी आल्यावर त्यांना त्रास होऊ लागल्याने तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती जास्तच खालावल्यामुळे भुसावळ येथे नेत असतानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. भिरूड यांचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
टॅग्स