दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

जळगाव - सुरवातीला बऱ्यापैकी पाऊस होऊन पिके तरारली. मात्र, यंदा चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगवत असतानाच काही भागांत अतिवृष्टीमुळे पिके हातची गेली. ज्वारी काळवंडली, डोक्‍यावर कर्ज व त्याचे व्याज आता कसे फेडणार, या विवंचनेतून आज जळगाव तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. धानवड येथील मिठाराम पाटील व आमोदे येथील नाटेश्‍वर सूर्यवंशी अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत.

मिठाराम वसंत पाटील यांची धानवडला आलेली दोन एकर शेती आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिरिक्त पावसामुळे शेतात तरारलेले कपाशीचे पीक खराब झाले, ज्वारीदेखील काळी पडून तोंडाचा घास गेला. 
 
डोक्‍यावर कर्ज दुप्पट होऊन घेणाऱ्यांना तोंड कसे दाखवायचे, या विवंचनेत मिठाराम हे गेल्या दोन दिवसांपासून कुणाशीही बोलत नव्हते. शनिवारी शेतातून परतल्यावर नुकसानीमुळे जेवणाचा घास घशाखाली उतरला नाही.
कुटुंबावर संकट कोसळले. कुटुंबाला हातभार लागावा, म्हणून पत्नी सुनीता आज गावातील अशोक पाटील यांच्या शेतात मजुरीला निघाली. पत्नीला मजुरीला गेली असताना मुलगा रोहन व मुलगी जागृती दोघेही सुटी असल्याने घराबाहेरच खेळत होते. कुटुंबातील त्यावेळचा एकांत साधून मिठाराम पाटील यांनी छताला दोरी बांधत गळफास घेतला. मुलगी घरात शिरल्यावर दुपारी दोनला वडिलांच्या गळफासाचे दृष्य पाहून तिने आरडाओरड करून शेजारच्यांना मदतीला बोलावले. गावकऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात आणल्यावर डॉक्‍टरांनी मिठाराम यांना मृत घोषित केले. यावेळी जमलेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. 
 
नागेश्‍वरच्या मृत्यूने कर्ता हरपला 
जळगाव तालुक्‍यातील आमोदे येथील रहिवासी तथा अल्पभूधारक शेतकरी नाटेश्‍वर (ज्ञानेश्‍वर) भगवान सूर्यवंशी (वय ४३) हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता. ७) शेतात कामावर गेले होते. पिकात साचलेले पाणी आणि झालेल्या नुकसानीमुळे हतबल होऊन घरी परतले. दिवस उजाडण्यापूर्वीच पाच वाजताच त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ज्ञानेश्‍वर यांच्या कुटुंबात आईवडील, पत्नी असा परिवार असून, दहा वर्षांपूर्वी त्यांच्या लहान भावाचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबाचा एकमेव आधार ज्ञानेश्‍वर होता.

Web Title: farmer suicide in jalgav