किटकनाशकाच्या प्रादूर्भावाने आठ दिवसात तीन शेतमजूराचा मृत्यू; 15 जणांना बाधा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

पिकांवर आलेली रोगराई, किडीचे आक्रमण रोखण्यासाठी तसेच पिकांना फळधारणा यावी यासाठी ‘टॉनिक’ची फवारणी केली जात आहे. उग्रस्वरुपाचे हे किटकनाशक असल्याने त्यांच्या प्रादुर्भाव तालुक्यात दिसून येत आहे. मागील आठ दिवसात तालुक्यात तीन शेतमजूरांचा मृत्यू झाला, तर 15 शेतकरी, शेतमजूर बाधीत झाले. त्यांचेवर वणी, चंद्रपुर, यवतमाळ व सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

मारेगाव : पिकांवर आलेली रोगराई, किडीचे आक्रमण रोखण्यासाठी तसेच पिकांना फळधारणा यावी यासाठी ‘टॉनिक’ची फवारणी केली जात आहे. उग्रस्वरुपाचे हे किटकनाशक असल्याने त्यांच्या प्रादुर्भाव तालुक्यात दिसून येत आहे. मागील आठ दिवसात तालुक्यात तीन शेतमजूरांचा मृत्यू झाला, तर 15 शेतकरी, शेतमजूर बाधीत झाले. त्यांचेवर वणी, चंद्रपुर, यवतमाळ व सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

मारेगाव तालुक्यातील माळपठारावरील सोयाबिनची स्थिंतीचिंताजनक आहे. पावसाअभावी पीक हातुन जाण्याची भीती शेतकर्‍यांना आहे. कापूस, तूर पिकांची स्थिती सद्या समाधानकारक आहे. मात्र, या पिकांसोबत सोयाबीन वर विविध रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. बोंडअळीने आक्रमण केले आहे. रोगराई व किडीपासून रोगांचा नायनाट व्हावा तसेच पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी उग्रस्वरूपाच्या किटकनाशकाची फवारणी करीत आहे.त्याचा प्रादूर्भाव होवून मारेगाव येथील शेतमजूर वसंता केशव सिडाम (45) याचा शुक्रवार (ता.आठ) मृत्यू झाला. आज (ता.10) तालुकयातीलच कोलगाव येथील शेतमजूर मारोती रामचंद्र पिंपळकर (50), घोडदरा येथील दिवाकर तुळशीराम घागी (40) यांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून मारेगाव तालुक्यात उग्रकिटकनाशक द्रव्य फवारणीच्या प्रादूर्भावने किमान 15 शेतकरी शेतमजूर बाधित झाले आहे. त्यांचेवर वणी, चंद्रपूर, यवतमाळ, सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. किटकनाशकाच्या प्रादूर्भावामुळे शेतकर्‍यांत भितीचे सावट पसरले आहे.