नव्या बसस्थानक परिसरातून पाच ट्रॅक्‍टर कचरा जमा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

जळगाव - सध्या जळगाव शहरात डेंग्यू, मलेरियासह विविध साथरोगांनी थैमान घातले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जळगाव फर्स्ट’ या फोरमच्या माध्यमातून शहरातील नव्या बसस्थानकावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिसर स्वच्छ असला की, डासांची उत्पत्ती होणार नाही व पर्यायाने आरोग्य चांगले राहील, हा संदेशही या मोहिमेच्या निमित्ताने देण्यात आला. 

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यातही डेंग्यू तसेच इतर साथरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. जळगाव शहरात तर ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले असून शहराची नियमित स्वच्छताही होत नाही. सार्वजनिक ठिकाणांची अवस्था तर यापेक्षा वाईट आहे.

महापालिका यंत्रणा संपूर्ण शहरात स्वच्छता करण्यासाठी पूर्णपणे अपेशी ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणे अशाप्रकारचे रोग पसरविण्याला कारणीभूत ठरत असतात. म्हणून ‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून डॉ. राधेश्‍याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नव्या बसस्थानक परिसरात स्वच्छता करण्यात आली. 

जळगावच्या जागरूक, संवेदनशील तरुणाईने रविवारी सकाळी साडे वाजेपासून साडेबारा वाजे पर्यंत नवीन बसस्थानकाचा परिसर चकाचक केला. स्थानकाच्या आवारात वाढलेले गवत, प्लास्टिक कचरा, कुजलेला कचरा असा सुमारे पाच ट्रॅक्‍टर कचरा संकलित करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. 

यांचा होता सहभाग
‘जळगाव फर्स्ट’च्या या मोहिमेत नेचर क्‍लब, मू.जे. महाविद्यालय, युवाक्रांती प्रतिष्ठान, गणेशवाडी या संस्थांमधील विद्यार्थी, कार्यकर्त्यांचा समावेश होता. डॉ. जुगलकिशोर दुबे, मनोज चौधरी, डॉ. धनराज चौधरी, विठ्ठल पाटील, डॉ. विकास पाटील, मनीषा गवस, सुश्‍मिता पाटील, वैशाली झाल्टे, राहुल गव्हाले, सचिन जंगले, इंटकचे राजेश पाटील, शब्बीर शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. जागरूक तरुण स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत 
सहभागी झाले.

विशेष म्हणजे बसस्थानकावर नियमित येणाऱ्या विद्यार्थ्याने पत्र लिहून ‘जळगाव फर्स्ट’कडे तशी मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ‘जळगाव फर्स्ट’तर्फे आवाहन केल्यानंतर  तरुण जबाबदार, संवेदनशील जळगावकर मिळून जळगावच्या नवीन बस स्थानकावर साफ सफाई साठी एकत्र जमले होते.

Web Title: garbage collected in bus stop