छेड काढल्याने तरुणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

नांदगाव/बाणगाव बुद्रुक - छेड काढल्याचा मनस्ताप सहन न झाल्याने 17 वर्षांच्या तरुणीने अगोदर विषप्राशन करून व नंतर विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवल्याचा प्रकार तांदूळवाडी (ता. नांदगाव) येथे घडला. संबंधित तरुणीची छेड काढणारा संशयित संगम रमेश गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

तांदूळवाडी येथील लहानू चंद्रभान काळे, त्यांची पत्नी व मुलगा लग्नानिमित्त बाहेर गेले होते. त्यांची मुलगी पूनम ऊर्फ मंगल ही घरात एकटीच होती. दुपारी तीनच्या सुमारास संशयित संगम गायकवाड हा घरात आला व त्याने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान, लहानू काळे घरी परतले. तेव्हा त्यांना त्यांच्या घरातून नाल्याच्या दिशेने एक जण पळून जाताना दिसला. घरात पूनम रडत असलेली त्यांना दिसली. संगम याने आपली छेड काढली असून, मारहाण केल्याचे तिने वडिलांना सांगितले. गावातील लोकांना बोलावून आपण त्यांच्या लक्षात हा प्रकार आणून देऊ, अशी समजूत काढली व ते बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेले.

दरम्यानच्या काळात पूनमची आई संगीता व भाऊ बाबासाहेब घरी परत आले. त्यांना घरात पूनम दिसली नाही. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता एका शेतातील विहिरीत तरंगत असलेला पूनमचा मृतदेह त्यांना दिसला. पूनम हिने छेड काढण्याचा मनस्ताप सहन न झाल्याने अगोदर विष प्राशन केले व मग विहिरीत उडी घेतली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: girl suicide