घंटागाडीवर लवकरच जीपीएस यंत्रणा - रवींद्र जगताप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मालेगाव - महापालिकेच्या घंटागाड्या, ट्रॅक्‍टर यांसह स्वच्छता ठेकेदार वॉटरग्रेसच्या ४० घंटागाड्या व ४० ट्रॅक्‍टरवर दोन महिन्यांत जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी सांगितले. 

चाचणी स्वरूपात १४ घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा सुरू केली आहे. मात्र, त्याचे लोकेशन फक्त ठराविक मोबाईलवरच मिळते.

महापालिका व ठेकेदाराच्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर स्वच्छतेच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल. याबरोबरच ट्रॅक्‍टर व घंटागाड्या दररोज नियमितपणे कचरा संकलन करतात की नाही,

याबाबतची माहिती मिळू शकेल. ही यंत्रणा सुरू केल्यास स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत गुणांकन वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे इंधन चोरीलाही आळा बसू शकेल. महापालिकेच्या स्वच्छता वाहनांमार्फत वाहनचालक, भांडारपाल व कर्मचारी संगनमताने इंधन चोरी करतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. स्वच्छतेचा ठेका देऊनही नियमित स्वच्छतेचा अभाव आहे. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढिगारे आढळून येतात. किमान मुख्य बाजारपेठा, प्रमुख रस्ते, शाळा, महाविद्यालय, मंदिर व प्रार्थनास्थळ परिसरात स्वच्छता असावी, या भागातील तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे. स्वच्छतेच्या तक्रारी तातडीने मार्गी लागण्यासाठी शहरवासीयांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन श्री. जगताप यांनी केले.

उत्तर महाराष्ट्र

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): जैताणे(ता.साक्री) येथील धनगर समाजाचे कार्यकर्ते तुकाराम नका ठाकरे हे गेल्या 30 वर्षांपासून...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

निजामपूर (धुळे): येथील जवाहरलाल वाचनालयातर्फे नुकतीच आठवी ते दहावी व अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात शिष्यवृत्ती...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

चार दिवसांवर उत्सव; मूर्तिकार, मंडळांचीही लगबग वाढली जळगाव - गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...अशी आर्त हाक देत...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017