सोने खरेदीसाठी पेढ्या गर्दीने फुल्ल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

नाशिक - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला पाडव्याचा मुहूर्त साधत आज सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफी पेढ्यांवर एकच गर्दी केली. सोने-चांदी, हिरे यांच्या खरेदीतून कोट्यवधीची उलाढाल शहरात झाली. ग्राहकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे सराफ पेठेत व्यवसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नोटाबंदीनंतर सराफ पेढ्यांवर आज रोख व्यवहारांऐवजी 70 टक्के व्यवहार हे डिजिटल स्वरूपात झाले. 

मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचा दुहेरी योग साधत आज ग्राहकांनी सोने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. शुद्ध सोने आणि तयार सोन्याच्या दागिन्यांसह हिरे जडीत अंगठी, आकर्षक डिझाइन असलेल्या कानातल्या दागिन्यांसह नेकलेस, बांगड्या, मंगळसूत्र, ब्रेसलेट आदींची खरेदी केली. यासाठी सराफ व्यावसायिकांनीही जय्यत तयारी करीत अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पाच ग्रॅम ते पन्नास ग्रॅम सोन्याच्या खरेदीवर साडी, यासह काही ठिकाणी मजुरीवर सवलत अशा योजना राबविल्या. ग्राहकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे रात्री उशिरापर्यंत सराफ पेढ्या सुरू होत्या. 

डिजिटल पेमेंटच्या प्रमाणात तिपटीने वाढ 
गेल्या वर्षी नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर आज सराफ बाजारपेठेत रोख व्यवहारांऐवजी डिजिटल पेमेंटद्वारे नागरिकांकडून सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिपटीने नागरिकांनी कार्डद्वारे व्यवहार केले. 

आज पाडव्याचा मुहूर्त साधत सोने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी बाजारपेठेत झाली होती. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रोख व्यवहारापेक्षा यंदा ग्राहकांकडून कार्डद्वारे व्यवहार करण्यावर अधिक भर होता. नोटाबंदीचा फारसा परिणाम आज व्यवहारांवर दिसून आला नाही. कार्डद्वारे पेमेंट करीत अनेक जण डिजिटल झाले. परंतु, बॅंकांनी व्यापाऱ्यांचे हित जाणून व्यापाऱ्यांकडून आकारले जाणारे कमिशन कमी करावे. त्यांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. 
- गिरीश टकले (संचालक, टकले ज्वेलर्स) 

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांनी सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. तयार दागिन्यांची खास करून मागणी होती. अनेकांनी ऑर्डर देऊन आज मुहूर्तावर सोने खरेदी केली. याचबरोबर हिऱ्यांच्या दागिन्यांनाही चांगली मागणी होती. 
- लकी आडगावकर (संचालक, आडगावकर ज्वेलर्स) 

Web Title: gudhipadwa gold shopping