इगतपुरी शहरासह तालुक्यात विक्रमी पाऊस : 24 तासांत 152 मिमी पाऊस

igatpuri.jpg
igatpuri.jpg

इगतपुरी : पावसाचे माहेरघर असणाऱ्या शहरासह तालुक्याच्या पाश्चिम घाट पट्टयासह इगतपूरी शहर आणि कसाराघाट पारिसरात रात्रीपासुनकोसळधार व संततधार पाउस झाला असुन गेल्या 24 तासात 152 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यात गेल्या 24 तासांपासून कोसळधार पाऊस होत असल्याने इगतपुरी, घोटी शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासापासुन पावसाबरोबर दाट प्रमाणात धुकेही आल्याने सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग सुद्धा मंदावल्याचे चित्र दिसुन आले. तालुक्यात आज (ता 15 ) अखेर 1 हजार 414 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. 

तालुक्यातील भात लागवड केलेल्या शेतीला तलवाचे सवरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान संततधार होत असलेल्या पावसामुळे इगतपुरी शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहराच्या विविध भागात पाणी तुंबले असुन सगळीकडे पाणीच पाणी दिसुन येत आहे.  मुसळधार पावसाची धार तुटत नसल्यामुळे धरणांच्या पतळीत लक्षणीय व समाधानकारक अशी वाढ झाली आहे.  घोटी, इगतपुरी व परिसरात मुसळधार पाऊस झाला असून संततधार पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे हा पाऊस रात्रीपासुन आज उशिरा पर्यत  सुरूच राहील्याने याचा थेट परिणाम जन जीवनावर झाला आहे.

दरम्यान चौवीस तासात घोटी शहरात 81 मिमी, तर धरण परिक्षेत्रात 100 मिमी पाउस, तसेच इगतपुरी शहरात 152 मिमी, दारणा धरणाच्या परिक्षेत्रात व परिसरात 68 मिमी, भावली धरण परिसरातही विक्रमी 124 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे धरण साठ्यांमध्ये ही भरीव वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील अति पावसाच्या भागात पाऊसाने जोरदार मुसंडी मारली आहे. घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पाश्चिम पट्टयातील भावली मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, घोटी, देवळे, टाकेघोटी, कावनई, कारावाडी, अवळखेड, काराचीवाडी चिंचले खैरे तसेच पुर्व भागातील गोदें, पाडळी देशमुख, अस्वली मुकणे, जानोरी नांदगाव, वाडीव-हे, सांजेगाव, म्हसुर्ली, आहुर्ली, वैतरणा, टाकेद, साकुर, शेणीत माणिकखांब, देवळे, खैरगाव, आंबेवाडी इंदोरे, वासाळी, खेड, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, तळेगाव, बलायदुरी, पारदेवी त्रिंगलवाडी व आदी भागात पावसाने दमदार बरसात केल्याने पश्चिम पट्ट्यात व पूर्व भागातील मानवेढे, काळूस्ते, वैतारणा पट्टयात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेती जलमय झाल्याचे चित्र दिसुन येत आहे.

इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन  दिवसांपासुन झालेल्या संततधार पावसामुळे भात लागवडीला वेग आला असुन आज अखेर तालुक्यात 45 टक्के भात लागवड झाल्याची माहीती कृषी विभागाने दिली आहे 

 इगतपुरी तालुक्यातील सहा मंडळामधील आजचा पाऊस असा 
( पाउस मिलीमिटर मध्ये)
धारगाव :130
टोकद :43
वाडीवऱ्हे :74
नादंगाव बु : 68
घोटी : 81
इगतपुरी :152

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com