इतिहास संग्रहालयाचे रुपडे पालटणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नाशिक - शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी सामाजिक दायित्वातून निधी खर्च करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत मुंबईच्या जीव्हीके कंपनीची भर पडली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी संकलित केलेल्या शिवकालीन साहित्याचे कायमस्वरूपी प्रदर्शन भरविण्यासाठी इतिहास संग्रहालयाचे सौंदर्यीकरण केले जाणार असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात कंपनीमार्फत दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. कंपनीला काम करण्यास महासभेने आज हिरवा कंदील दाखविला असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रयत्नातून प्रकल्प साकारला जाणार आहे.

गंगापूर रोडवरील जुने पंपिंग स्टेशन येथे इतिहास संग्रहालयाची निर्मिती केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रयत्नांतून जीव्हीके कंपनीमार्फत सामाजिक दायित्वातून विविध विकासकामे केली जाणार आहेत. याबाबतचा सामंजस्य करार यापूर्वीच झाला आहे. कंपनीला कामे करण्यासाठी महासभेची मंजुरी आवश्‍यक होती, ती आज मिळाली. संग्रहालयात विविध कामे पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहे. त्यानंतर शिवशाहीर पुरंदरे यांनी संकलित केलेल्या शिवकालीन वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन भरविले जाणार आहे. हा प्रकल्प नाशिकच्या पर्यटन विकासाला चालना देणारा ठरेल.

"सीएसआर‘मधून झालेली कामे 

यापूर्वी राज ठाकरे यांनी सामाजिक दायित्वातून शहरात विविध विकासकामे केली आहेत. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपये खर्च करून गोदापार्क विकसित केला जात आहे. बी. जी. शिर्के कंपनीकडून अहिल्यादेवी होळकर पुलावर फाउंटन वॉल उभारण्याचे काम सुरू आहे. शहरातील 40 वाहतूक बेटे यापूर्वी सीएसआरमधून विकसित केली आहेत. फाळके स्मारक व पाथर्डी फाटा ते आडगाव नाकादरम्यान उड्डाणपुलाखाली खासगीकरणातून उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे. टाटा कन्सल्टन्सीतर्फे पांडवलेणीच्या पायथ्याशी बोटॅनिकल गार्डनची निर्मिती केली जात आहे.

असे पालटणार संग्रहालयाचे रुपडे 

पहिला टप्पा ः प्रवेशद्वार सुशोभीकरण व परिसर विकसित करणे, मुख्य संग्रहालय इमारतीत सुधारणा करणे, विद्युतीकरण, लायटिंग, साइन बोर्ड लावणे, कलात्मक कामे व पेंटिंग्ज, इंटिरिअरची कामे मार्गी लावणे.

दुसरा टप्पा ः छोटे ऍम्फी थिएटर, ऐतिहासिक भिंत उभारणे, संग्रहालयालगतचा भाग विकसित करणे, निरीक्षण गॅलरी विकसित करणे.