फलोत्पादनवाढीसाठी सूक्ष्मसिंचनावर देणार भर - गिरीश महाजन :

सचिन जोशी
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

जळगाव - 'सर्वसाधारण शेती असो की फलोत्पादन, प्रवाही सिंचन प्रणालीमुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे प्रवाही सिंचनाला फाटा देत बंद जलवाहिन्यांद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याद्वारे राज्यभरात केवळ फलोत्पादनाची सिंचन क्षमता दीडपटीने वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. फळबागांना पाणी जास्त लागत असले, तरी त्यासाठीही सूक्ष्मसिंचनाचा वापर अधिक होईल,'' असे धोरण आता राज्यभर राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

नाशिक येथे "सकाळ-ऍग्रोवन' आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे होत असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. महाजन म्हणाले, की नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, जळगाव व धुळे जिल्ह्यात केळी, पेरू, मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फळबागांना पाणी अधिक प्रमाणात लागते. जळगावसारख्या मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यात तर जमिनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो. त्यामुळे रावेर, यावल व चोपडा यांसारखे तालुके "डार्क झोन'मध्ये गेले आहेत. अर्थात, सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्यानेच ही स्थिती उद्‌भवली आहे.

दीडपट वाढणार सिंचन क्षमता
एकीकडे प्रकल्पावरील खर्च कमी करून सूक्ष्मसिंचनावर अनुदान दिल्यास सिंचन क्षमता वाढून पर्यायाने उत्पादनही वाढणार आहे. सिंचनाच्या पद्धतीच्या या नव्या प्रयोगामुळे सामान्य शेती उत्पादनच नव्हे, तर फलोत्पादनही वाढून या क्षेत्रात नवीन क्रांती घडून येईल. शेतकऱ्यांपुढील समस्यांवर तात्पुरता इलाज न करता शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व सक्षम करण्यासाठी शेती, फलोत्पादनाच्या शाश्‍वत विकासाचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र व राज्य सरकार यासाठी आग्रही असून शेतकरी, फळबागायतदारांनी त्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही गिरीश महाजन यांनी केले.

Web Title: horticulture will focus on the irrigation