275 अपक्ष महापालिका निवडणूक मैदानात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

महापालिका निवडणुकीसाठी एक हजार 443 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेनंतर 821 उमेदवार रिंगणात राहिले. राष्ट्रीय, राज्यस्तरीय व त्याव्यतिरिक्त निवडणूक आयोगाची मान्यता असलेल्या पक्षांचा विचार करता अपक्षांची संख्या अधिक आहे.

नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी व अपक्षांना चिन्हवाटप झाल्यानंतर 821 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात राष्ट्रीय पक्षांचे 262, राज्यातील पक्षांचे 221, तर नोंदणीकृत अन्य पक्षांचे 63 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांविरोधात 275 अपक्ष मैदानात उतरले आहेत. 

महापालिका निवडणुकीसाठी एक हजार 443 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेनंतर 821 उमेदवार रिंगणात राहिले. राष्ट्रीय, राज्यस्तरीय व त्याव्यतिरिक्त निवडणूक आयोगाची मान्यता असलेल्या पक्षांचा विचार करता अपक्षांची संख्या अधिक आहे. राजकीय पक्षांमध्ये 122 पैकी सर्वाधिक 119 जागांवर भाजपचे उमेदवार आहेत. त्याखालोखाल शिवसेना 112, त्यानंतर मनसेचे 97 उमेदवार उभे केले आहेत. 

राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार 
भारतीय जनता पक्ष ः 119 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ः 54 
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ः 2 
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्‍सवादी) ः 14 
बहुजन समाज पक्ष ः 32 
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ः 41 
-------------- 
राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार 
शिवसेना ः 112 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ः 97 
एआयएमआयएम ः 9 
समाजवादी पक्ष ः 3 
----------------- 
इतर नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार 
जनसुराज्य शक्ती ः 1 
राष्ट्रीय समाज पक्ष ः 5 
भारिप-बहुजन महासंघ ः 14 
बहुजन विकास आघाडी ः 6 
रिपाइं (सेक्‍युलर) ः 4 
धर्मराज्य पक्ष ः 11 
आंबेडक राइट पार्टी ऑफ इंडिया ः 2 
संभाजी ब्रिगेड ः 2 
भारतीय संग्राम परिषद ः 6 
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ः 3 
भारतीय जनहित कॉंग्रेस पार्टी ः 1 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) ः 8 

Web Title: independent candidates in election