जगन्नाथ वाणी यांचे कॅनडामध्ये निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

धुळे : १९६५ पासून कॅनडास्थित आणि सामाजिक कार्यातून भारतासह कॅनडात ठसा उमटविणारे, दानशूरतेतून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविणारे प्रा. डॉ. जगन्नाथ काशिनाथ वाणी (वय ८३ रा. धुळे) यांचे भारतीय आज सकाळी १०.३० कर्करोगाने कॅलगरी (कॅनडा) येथे निधन झाले. त्यांच्यावर  कॅनडामध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत.

डॉ. वाणी यांनी धुळ्यात का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, मुक बधिरांसाठी शाळा स्थापन केली. विज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी रेऊ वाणी विज्ञान विहार, गरीब विद्यार्थ्यांची गावोगावी नेत्रतपासणी करून मोफत चष्मे वाटप, कमलिनी आय हॉस्पिटलची उभारणी व गरीबांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया, सिजोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांसाठी पुण्यात सामाजिक कार्याची उभारणी व त्यातील संघटनातून राज्यभरातील अशा रूग्णांच्या मदतीसाठी पुढाकार आदी विधायक कार्यातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

डॉ. वाणी यांना कार्यकर्तृत्वामुळे कॅनडा सरकारने तेथील सर्वोच्च बहुमानाच्या 'ऑर्डर ऑफ कॅनडा' या पुरस्काराने सन्मानित केले होते. 

टॅग्स