शंभरी ओलांडलेल्या ब्रिटिशकालीन दगडी पुलाला धोका

विजय पगारे
शुक्रवार, 25 मे 2018

इगतपुरी : शंभरी ओलांडली तरीही वाढत्या रहदारीचा भार सोसणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणाकडे जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला अस्वली स्टेशन जवळील दगडी पुलाला धोका निर्माण झाला आहे.अवजड वाहने पुलावरून गेल्यास पुलाला हादरे बसल्याचे जाणवत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.       

इगतपुरी : शंभरी ओलांडली तरीही वाढत्या रहदारीचा भार सोसणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणाकडे जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला अस्वली स्टेशन जवळील दगडी पुलाला धोका निर्माण झाला आहे.अवजड वाहने पुलावरून गेल्यास पुलाला हादरे बसल्याचे जाणवत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.       

वाहतुकीच्या दृष्टीने अरुंद असलेला हा पूल जवळपास 113 वर्षांचा झाला आहे.ब्रिटिश काळात 1906 मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत दारणा धरणाची निर्मिती करण्यात येत असतांना ब्रिटिश अधिकारी नाशिकहून नांदगाव बुद्रुकला धरणावर येत असे त्यावेळी हा पूल मोठ्या आकाराच्या काळ्या रंगाच्या दगडांत बांधण्यात आला आहे.विशेष म्हणजे शंभर वर्षे पूर्ण झाली असली तरी या पुलाचा साधा एक दगड जरी इकडे तिकडे झालेला नसला तरी दोनवर्षांपूर्वी सावित्री नदीवरील पुलाची दुर्दैवी घटना बघता शासनाने राज्यातील सर्व जीर्ण पुलांचे अहवाल संबंधित विभागाला सादर करायला सांगितले होते.

तर इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनीही पाहणी करत असताना या पुलाचा अहवाल सादर करावा असे आदेश संबंधितांना दिले होते.मात्र तरीही स्थानिक पातळीवरून या पुलाचा अहवाल शासनापर्यंत गेला कसा नाही असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.याबाबत डोळेझाक करणा-या अधिकाऱ्यांनी शासनाला व लोकप्रतीनीधींना जणू वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा प्रकार केल्याची भावना व्यक्त होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून साकुरफाटा ते वाडीव-हे (व्ही टी सी) या चौदा किमी राज्य मार्गाची नव्याने निर्मिती झाली दारणा धरणाखाली नवीन उड्डाणपूल झाला.त्यामुळे मुंबईकडून मुंढेगाव तसेच नाशिककडून अस्वली स्टेशन मार्गे या राज्य मार्गावर हजारो जड ,अवजड वाहनांची ये जा सुरू झाली.मात्र याच मार्गावर महत्वाची भूमिका बजावणारा हा जुना पूल अजूनही अरुंद स्थितीत जसाचे तसाच तग धरून उभा आहे.

रात्रंदिवस वाढत्या रहदारीमुळे पुलाच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला असून या पुलाची पाहणी करून हा पूल अजून किती दिवस वाहतुकीयोग्य आहे किंवा नाही याचे परीक्षण होणे गरजेचे आहे.

Web Title: it is dangerous bridge which cross 100 years