स्वच्छतेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा - कविता राऊत

जेल रोड - महापालिका शाळेत स्वच्छता अभियानप्रसंगी बोलताना धावपटू कविता राऊत व उपस्थित मान्यवर.
जेल रोड - महापालिका शाळेत स्वच्छता अभियानप्रसंगी बोलताना धावपटू कविता राऊत व उपस्थित मान्यवर.

जेल रोड - स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. देशाचे उद्याचे नागरिक, तसेच स्वच्छतेचे खरे प्रतीक विद्यार्थी आहेत म्हणून त्यांनी स्वच्छतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन स्वच्छतेची ब्रॅंड ॲम्बेसेडर व आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने केले. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४ जानेवारी २०१८ ला होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी जेल रोड येथील महापालिका शाळा क्रमांक ३६ येथे कार्यक्रम झाला. त्या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ती बोलत होती. नाशिक रोड महापालिका आरोग्य विभागातर्फे हा कार्यक्रम झाला. 

कविता राऊत हिने विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. शाळा ३६ चे प्रभारी मुख्याध्यापक विठ्ठल नागरे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. प्रभाग सभापती सुमन सातभाई, नगरसेविका मीराताई हांडगे, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, श्री. सूर्यवंशी, ज्ञानेश्‍वर भोसले, जनता विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, मुख्याध्यापक कचरू लभडे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com