सात वर्षांनंतर मार्चअखेरीस पारा 44 अंशांवर! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

जळगाव - शहरातील तापमान दरवर्षी सर्वाधिक नोंदविले जात असते. गेल्या आठवड्यापासून दिवसागणिक अंशाअंशाने शहराचा पारा वाढत असून, आज यंदा प्रथमच 44 अंशांची पातळी ओलांडून उच्चांक गाठला आहे; तर किमान तापमानदेखील 23 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने मार्चअखेरीस वाढलेल्या तापमानाने उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या सात वर्षांनंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 44 अंशांवर पोहोचल्याची नोंद आहे. 

जळगाव - शहरातील तापमान दरवर्षी सर्वाधिक नोंदविले जात असते. गेल्या आठवड्यापासून दिवसागणिक अंशाअंशाने शहराचा पारा वाढत असून, आज यंदा प्रथमच 44 अंशांची पातळी ओलांडून उच्चांक गाठला आहे; तर किमान तापमानदेखील 23 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने मार्चअखेरीस वाढलेल्या तापमानाने उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या सात वर्षांनंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 44 अंशांवर पोहोचल्याची नोंद आहे. 

यंदाचा उन्हाळा काहीसा लवकर जाणवू लागला आहे. शहरातील तापमानाचा पारा गेल्या आठवड्यापासूनच चाळिशीवर पोहोचला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाचा जळगावचा राज्यात उच्चांक असतो. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेमध्ये उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागते; परंतु यंदा तापमानाचा पारा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उंचावत आहे. गेल्या काही वर्षांचा अंदाज घेता, दरवर्षी तापमानात वाढ होत आहे. यंदाही मार्चमधील आतापर्यंतच्या तापमानाचा आढावा घेतला असता, त्यात वाढ झाली आहे. गतवर्षी मार्चमधील सर्वाधिक तापमान 27 मार्चला 42 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. यंदा दोन अंशांनी वाढ होऊन पारा 44 अंशापर्यंत पोहोचला आहे. "ग्लोबल वॉर्मिंग'च्या परिणामांमुळे उष्णतेत वाढ होत आहे. 

2009 सर्वाधिक "हीट वर्ष' 
जळगावातील तापमान राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत अधिकच असल्याची नोंद होत असते. दरवर्षी तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. त्यातच 2009 हे जळगावकरिता सर्वाधिक "हीट वर्ष' राहिले आहे. याच वर्षात मार्चमध्ये तापमान 44.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. यानंतर यावर्षी मार्चमध्ये प्रथमच तापमान 44 अंशांवर आले आहे. शिवाय, गेल्या पंधरा वर्षांतील सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद एप्रिल 2009 मध्ये 49.2 अंश नोंदले गेले होते. यापूर्वी 2007 मध्ये मेमध्ये पारा 48.2 अंश सेल्सिअस, तर मे 2010 मध्ये पारा 48.2 अंशांपर्यंत पोहोचल्याची माहिती जैन इरिगेशनच्या हवामान विभागातील डॉ. अभिलेख मिश्रा यांनी दिली. 

"मे हीट'चा तडाखा 
दोन दिवसांपासून तापमानासोबतच उकाड्यातदेखील प्रचंड वाढ झाल्याचा अनुभव जळगावकरांना येत आहे. सकाळी अकरापासूनच तीव्र उष्ण झळा जाणवू लागल्याने रस्त्यांवरील वर्दळ आतापासूनच कमी होऊ लागली आहे. सावलीत उभे राहिल्यानंतरही उष्णतेच्या लाटा असह्य होत आहेत. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असून, उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मार्चच्या मध्यंतरी आलेल्या थंडीच्या लाटेनंतर अचानक तापमानात दिवसागणिक वाढ होत असल्याने, आतापासूनच "मे हीट'चा अनुभव जळगावकरांना येऊ लागला आहे.

Web Title: jalgaon @ 44