चाळीसगाव: वाळूचे सात ट्रॅक्टर जप्त; तहसीलदारांनी केली कारवाई

दीपक कच्छवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

ट्रॅक्टरमालकांची अरेरावी
जामदा गिरणा नदिपात्रात महसुल विभागाने छापा टाकला असता,रात्री गिरणा नदीपात्रात थांबलेल्या ट्रॅक्टरमालकांनी पथकाशी अरेरावी करीत अंगावरही धावून जाण्यापर्यत त्यांची मजल गेली.वाळुचोरांची मुजोरी वाढल्याने एकाद्यावेळी महसुल कर्मचार्याचा  जीव घेण्यासही ते मागे-पुढे पाहणार नाही असे पथकातील कर्मचार्यानी सांगितले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : जामदा (ता.चाळीसगाव) नदिपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरचालकांवर महसूल पथकाने कारवाई केली. असुन सातही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. यात चाळीसगाव येथील माजी नगरसेवकाचे चार व इतरांचे तीन ट्रॅक्टरांचा समावेश आहे.या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

जामदा गिरणा पात्रात गेल्या काही दिवसापासून रात्रीची चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे.तहसिलदार कैलास देवरे यांच्या पथकाने आज   पहाटे दिड वाजेच्या सुमारास आचानक गिरणा नदिपात्रात धडक दिली.या ठीकाणी सात ट्रॅक्टर वाळू भरतांना मिळुन आले.अचानक टाकलेल्या या धाडीमुळे एकच गोंधळ उडाला होता.

दंडात्मक कारवाई होणार 
जामदा येथील गिरणा नदिपात्रात वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरपैकी चार ट्रॅक्टर प्रभाकर चौधरी यांचे असल्याची माहिती तलाठी आर.डी.नन्नवरे यांनी सांगितले.शिवाय सुनिल भगवान पाटील, शेख रुबाब शेख दादामियाॅ व शंकर रामचंद्र पाटील यांचे प्रत्येकी एक ट्रॅक्टर जप्त केले. वाळुसह पस्तीस लाख रुपये किमतीचा हा मुद्देमाल असल्याची माहिती श्री. नन्नवरे यांनी दिली. सर्व ट्रॅक्टर मेहुणबारे पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले  आहेत. या पथकात स्वत: तहसिलदार कैलास देवरे, नायब तहसीलदार श्री अगळे , तलाठी बी.एल.येडे, एन.के.अहीरे, एस.के. शिर्के, एस.डी.चव्हाण,विजय शेळके यांचा सहभाग होता.या सर्वानी ही कारवाई केली.या ट्रॅक्टर्सवर दंडात्मक कारवाईचा निर्णय प्रांतधिकारी घेतील असे महसुल विभागातर्फे सांगण्यात आले.

रात्री होतय वाळु चोरी
जामदासह जवळच्या मेहुणबारे, वडगाव, तिरपोळे, व उंबरखेडे या भागात रात्रीची वाळुची सर्रास चोरी सुरू आहेत. मेहुणबारे गिरणा पात्रातुन बैलगाडीतून वाळुची चोरटी वाहतुक केली जाते.काही राजकीय पदाधिकारी अप्रत्यक्षरित्या वाळु व्यवसायात उतरल्यामुळे बर्याचदा कारवाया करतांना प्रशासकीय अधिकारी यांना कठीण जाते . बैलगाडीतून वाळुची वाहतुक करून ढीग केला जातो.व दहा टायर ट्रक भरला जातो.सध्या  जामदा गिरणा पात्रातुन मोठ्या प्रमाणावर वाळुची चोरी होत आहे. प्रशासनाने कारवाया होऊनही वाळुची चोरटी वाहतूक कमी झालेली नाही.

ट्रॅक्टरमालकांची अरेरावी
जामदा गिरणा नदिपात्रात महसुल विभागाने छापा टाकला असता,रात्री गिरणा नदीपात्रात थांबलेल्या ट्रॅक्टरमालकांनी पथकाशी अरेरावी करीत अंगावरही धावून जाण्यापर्यत त्यांची मजल गेली.वाळुचोरांची मुजोरी वाढल्याने एकाद्यावेळी महसुल कर्मचार्याचा  जीव घेण्यासही ते मागे-पुढे पाहणार नाही असे पथकातील कर्मचार्यानी सांगितले.