‘नगररचना’चा कारभार आता ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

जळगाव - महापालिकेच्या नगररचना विभागातून नागरिकांना बांधकाम, भोगवटा, नाहरकत आदी विविध प्रमाणपत्रांसाठी महिनोन्‌महिने चकरा माराव्या लागत असत. याची गंभीरतेने दखल घेत नगररचना विभागाचे कामकाज आता ऑनलाइन सुरू केल्याने आठ दिवसांत नागरिकांना परवानगी मिळणार आहे. या प्रणालीचे काल (२६ जानेवारी) महापौर ललित कोल्हे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.  

महापालिकेच्या नगररचना विभागातील बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र यासह विविध सेवा ऑनलाइन पद्धतीने देणारी प्रणाली काल महापौर कोल्हेंनी सुरू केली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, स्थायी समितीचे सभापती ज्योती इंगळे, महिला- बालकल्याण सभापती प्रतिभा कापसे, अप्पर आयुक्त राजेश कानडे, भाजप गटनेते सुनील माळी, नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी, शोभा बारी, सहाय्यक संचालक नगररचना मे. पी. बागूल, सहा. रचनाकार सुहास चौधरी, अभियंता प्रसाद पुराणिक, शकील शेख, भागवत पाटील, अतुल पाटील सर्व आर्किटेक्‍ट असोसिएशनचे सदस्य, मक्तेदार साफ्टेक इंजि. प्रा. लि. पुणे तसेच व महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आठ दिवसांत परवानगी
ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना बांधकामाबाबतची परवानगी, प्रमाणपत्र आठवडाभरात मिळणार आहे. तसेच नागरिकांचे प्रकरण नेमक्‍या कुठल्या स्तरावर आहे, त्यात काय त्रुटी आहेत याचीही स्थिती घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. तसेच प्रकरण दाखल करणारा व संबंधित अधिकारी यांनाच ही माहिती पाहता येणार आहे.

Web Title: jalgaon news city structure work online