राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पुन्हा देशात सत्तेवर येईल

राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पुन्हा देशात सत्तेवर येईल

जळगाव - अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. १६ डिसेंबरपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काँग्रेस पुन्हा देशभरात सत्तेत येईल, असा विश्‍वासही जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी चार डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात कोणीही अर्ज दाखल केला नसल्यामुळे आज त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. याबाबत कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल : संदीप पाटील
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. संदीप पाटील म्हणाले, की राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशभरात काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी जो प्रचार केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल ५० पेक्षाही अधिक सभा घ्याव्या लागल्या आहेत. मोदी यांना राहुल गांधी हे पर्याय झाले असून देशभरातील जनतेचा त्यांच्यावर विश्‍वास निर्माण झाला आहे.  

राहुल पंतप्रधान होतील : डॉ. उल्हास पाटील
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, की राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद आल्याने देशभरातील तरुण काँग्रेसकडे आकर्षित होतील, तसेच युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळेल. गुजरातमध्ये ते ज्या प्रमाणे कष्ट घेत आहेत. त्या प्रमाणे देशभरात कष्ट घेतील. २०१९ च्या निवडणुकीत ते देशाचे पंतप्रधान होतील. 

नवचेतना निर्माण होईल : डॉ. राध्येश्‍याम चौधरी
जिल्हा महानगर कार्याध्यक्ष डॉ. राध्येश्‍याम चौधरी म्हणाले, की पक्षात एक नवीन चेतना निर्माण होईल. राहुल गांधी यांच्या संयमी व संवेदनशील नेतृत्वामुळे देशभरातील युवा वर्ग काँग्रेसकडे येईल. पक्षात युवकांची भागीदारी वाढेल. त्यामुळे काँग्रेसला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

युवकांना संधी मिळेल : संजय वराडे
तालुका युवक काँग्रेसचे अधयक्ष संजय वराडे म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याने पक्षात आनंद आहे. त्यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळेल. काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस देशभरात पुन्हा सत्तेवर येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com