कापूस चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताचा कोठडीत मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

जळगाव - कापूस चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या वराड (ता. धरणगाव) येथील संतोष बंडू भिल या संशयिताचा आज रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याने त्याच्या नातेवाइकांनी गोंधळ घातला. त्याला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्याच्या नातेवाइकांनी केली आहे. अखेर प्रकरणाचा तपास "सीआयडी'कडे वर्ग करण्याचे आश्‍वासन उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. 

संशयित संतोष भिल याला कापूस चोरीच्या गुन्ह्यात पाळधी (ता. धरणगाव) औटपोष्ट पोलिसांनी अटक केली होती; मात्र शनिवारी (ता. 4) रात्री प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रविवारी (ता. 5) मध्यरात्री संतोषचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, निरीक्षक बापू रोहोम यांच्यासह राखीव पोलिस दल जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सांगळे यांनी संतोषच्या नातेवाइकांशी चर्चा करत संतप्त जमावाची समजूत काढली. 

Web Title: jalgaon news cotton news