‘घरवाली बाहरवाली’चा जळगावात धिंगाणा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

जळगाव - रिंग रोडला राहणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील पर्यवेक्षकाच्या घरात ‘घरवाली बाहेरवाली’चे भूत शिरले. बाहेरच्या महिलेशी संबंध असल्याने घरात भांडणे होत असल्याची तक्रार पत्नीने जिल्हापेठ पोलिसांत दिली. संबंधित महिला घरी धडकल्यावर ‘पती देव’ तिथेच आढळून आल्याने मात्र चांगलाच धिंगाणा झाला.

या प्रकरणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईनंतर पती-पत्नीची समजूत काढून रवाना केले. श्रीकृष्ण कॉलनी परिसरात महिलांचा वाद हाऊन गर्दी एकवटल्याची घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याची माहिती मिळाल्याने पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महिलांची झोंबा झोंबी सुरू असल्याने गर्दी एकवटली होती. वाद घालणाऱ्यांना पोलिस ठाण्यात आणल्यावर पत्नीने पतीचे प्रताप पोलिसांना सांगितले. घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत दोघा पती-पत्नींची समजूत काढली. मात्र, या प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा रंगली.

टॅग्स