सरकारविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

जळगाव येथे शेतकरी संघटनांची राज्य सुकाणू समितीची जाहीर सभा

जळगाव: सरकाने शेतकऱ्यांना दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची पुर्तता न केल्यामूळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे, त्यामूळे शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सुकाणू समीती मैदानात उतरली आहे.

जळगाव येथे आज (मंगळवार) राज्य सुकाणू समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला हजारो शेतकरी आपला प्रचंड आक्रोश सरकार विरोधात व्यक्त करत होते. शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुकाणू समितीचे खा. राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, डॉ अजित नवले, बाबा आढाव, रविकांत तुपकर, देवानंद पवार, कालीदास आपटे, प्रतिभाताई शिंदे, सुशीला मोराळे, प्रशांत पवार, आमदार बच्चू कडू, संजय पाटील, नरेंद्र पाटील, नामदेव गावडे, अशोक ढवळे, यशवंत इंगोले तसेच राज्य सुकाणू समितीचे इतर सदस्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.

सरकारने उरलेल्या काळात बळीराजाला दाद दिली नाही तर, पंढरीची नाही पण जेलची वारी करायची आहे. सर्वांनी सहभागी होवून सत्याग्रह करा: बाबा आढाव

जळगावः नोटा बंदीने एक तरी फायदा दाखवा, कष्ट करणाऱ्यांना नाही, भाजप सरकारला याचा फायदा झाला. अच्छे दिन आपले नाही तर फक्त भाजपचे आहे : आमदार बच्चू कडू

Web Title: jalgaon news farmer issue sukanu samiti and government