मनपा अग्निशामन विभागाचा आयुक्‍त आज घेणार आढावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

जळगाव - शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वाकोद गावाजवळ शनिवारी रात्री गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागून स्फोट झाला होता. ही आग विझविण्यासाठी जळगाव महापालिकेच्या अग्निशामन विभागाला बोलाविले. परंतु बॅटरी अभावी दोन बंब आग विझविण्यास जाऊ न शकल्याने महापालिकेचा पुन्हा गलथान कारभार समोर आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त आज अग्निशामन विभागाचा आढावा घेणार आहेत. 

वाढत्या आगीच्या व अपघाताच्या घटनांमुळे अग्निशामन दल "अत्याधुनिक' होण्याची 
गरज आहे. परंतु जळगाव महापालिकेच्या अग्निशामन दलातील दोन बंब केवळ बॅटरी नसल्याच्या किरकोळ कारणामुळे बंद असल्याने शनिवारी वाकोद गावाजवळ गॅस ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी जाऊ शकले नव्हते. त्यामुळे जळगाव शहरातील सुरक्षा ही वाऱ्यावर असल्याची दिसून येत आहे. अग्निशामन दलाचे शहरात चार युनिट आहेत त्या पैकी केवळ तीन बंब सुरू असून ते ही भंगार अवस्थेत असल्याची परिस्थिती आहे. शहरात मोठी आगीची घटना घडली तर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुरेशी यंत्रणा अग्निशामन विभागाकडे नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. 

अग्निशामनचे 80 लाख पडून 
अग्निशामन दलास दरवर्षी केंद्र, राज्य शासन तसेच आपातकालीन विभागाकडून 30 ते 40 लाखाचा 
निधी येत असतो. त्यामुळे विभागाकडे दीड कोटी रुपयांतून महापालिकेच्या इमारतीमध्ये आग विरोधी सिलिंडर, वस्तू खरेदी करण्यात आले. त्यातून जवळपास 80 लाख रुपये हे पडून आहे. त्याचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. 

तीन बंब अन्‌ ड्रायव्हर 22 
महापालिकेच्या अग्निशामन दलाचे शहरात चार युनिट सुरू असून आहे. त्यात केवळ तीन बंब सुरू असून तर काही गाड्या किरकोळ कारणास्तव बंद पडलेल्या आहेत. परंतु या विभागात गाड्यांपेक्षा चालकांची संख्या जास्त असून जवळपास 22 चालक असल्याची माहिती समोर आली आहे. 

आयुक्त घेणार आज आढावा 
आपातकालीन परिस्थितीत महापालिकेचे बंब केवळ बॅटरी नसल्याने आग विझविण्यास जाऊ शकले नाही. याबाबत उद्या (ता. 8) प्रभारी आयुक्त अग्निशामन दलाच्या आढावा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.