चाळीसगाव : 'गिरणा'च्या बंधाऱ्यात आढळले मृत मासे

शिवनंदन बाविस्कर
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

बंधाऱ्यातील भागात स्थानिक मासेमारी करणारे व्यावसायिक दोन पैसे मिळावे म्हणून छोटे मासे पकडतात. 'सकाळ'चे बातमीदार शिवनंदन बाविस्कर हे बंधाऱ्याचे छायाचित्र घेण्यासाठी गेले असता त्यांनाच हा प्रकार लक्षात आला.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : नुकत्याच झालेल्या पावसामुळे येथील गिरणा नदीवरील बंधाऱ्यात पाणी साचले आहे. या पाण्यात आजूबाजूचे गढूळ पाणी वाहून आल्याने पाण्यात बारीक आकाराचे मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत.

बंधाऱ्यातील भागात स्थानिक मासेमारी करणारे व्यावसायिक दोन पैसे मिळावे म्हणून छोटे मासे पकडतात. 'सकाळ'चे बातमीदार शिवनंदन बाविस्कर हे बंधाऱ्याचे छायाचित्र घेण्यासाठी गेले असता त्यांनाच हा प्रकार लक्षात आला. प्रथमदर्शी पाण्यात चुरमुरे असल्याचा भास झाला. मात्र जवळ जाऊन निरखून पाहिल्यानंतर अगदीच लहान-लहान मासे मृत झाल्याने ते पाण्यावरच आलेले आढळून आले.

नेमके हे मासे कशामुळे मेले असावेत, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. दरम्यान, या मेलेल्या माशांबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

टॅग्स