जळगाव: गिरणा धरणाच्या पातळीत वाढ 

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 29 जुलै 2017

नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे चणकापूर आणि पुनद या धरणांत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. या धरणांचा साठा नियंत्रित करण्यासाठी दोन्ही धरणातून गिरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर हरणबारी धरण गुरुवारी(ता.27) सकाळी ओव्हरफ्लो झाले.

पिलखोड (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) : बुधवारी(ता. 26) 40 टक्के साठा असलेल्या गिरणा धरणात आतापर्यंत 7 टक्क्यांनी घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळी साठा 47 टक्के झाला असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे चणकापूर आणि पुनद या धरणांत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. या धरणांचा साठा नियंत्रित करण्यासाठी दोन्ही धरणातून गिरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर हरणबारी धरण गुरुवारी(ता.27) सकाळी ओव्हरफ्लो झाले. 

काल(ता. 28) संध्याकाळपर्यंत हरणबारीचे पाणी मालेगावच्या मोसम नदीत दाखल झाले. यामुळे सध्या चणकापूर, पुनद आणि हरणबारी अशा तीन धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे.

गुरुवारी(ता. 27) संध्याकाळी चणकापूर धरणातून 7 हजार 387 क्यूसेक तर पुनदमधून 3 हजार 139 क्यूसेक असे एकत्रित मिळुन ठेंगोडा बंधाऱ्यातून 8 हजार 313 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. काल सकाळी 11 हजार 290 क्यूसेकवर गेला होता. परंतु संध्याकाळी पाण्याचा विसर्ग कमी होऊन ठेंगोडा बंधाऱ्यातून 6 हजार 311 तर हरणबारीमधून 2 हजार 587 क्यूसेक विसर्ग गिरणात सुरू होता. 

यामुळे धरणात एकूण 11 हजार 620 दशलक्ष घनफुट साठा निर्माण झाला असून 8 हजार 620 दशलक्ष घनफुट असा जिवंत साठा आहे. दरम्यान धरणात सात टक्क्यांनी चांगली वाढ झाली असून 47 टक्के पाणीसाठा झाला आहे.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ठाणे अंमलदाराकडून तक्रार दाखल करून घेतली जाईलच याची खात्री नसते....

01.27 AM

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017