दारूसाठी चोरला देवाचा बोकड

दीपक कच्छवा 
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

दारू व्यसनामुळे बनले चोरटे 
या तिघांनाही दारूचे व्यसन जडले आहे. दारपिण्यासाठी त्यांनी आपापल्या घरातील भांडी देखील विकली आहेत. शंभर रूपयांची वस्तु ते  पन्नास रुपयामध्ये विकायचे या तिघांजवळ पैसे नसल्यामुळे ते  बेचैन झाले होते त्यामुळे  त्यांनी बोकड चोरून विकण्यास  सुरवात केली होती.दारू पिण्यासाठी पैसे लागत होते. असे पोलिस चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस हवालदार  पंकज पाटील यांनी दैनिक 'सकाळ' ला दिली.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): देवाच्या नावाने सोडलेल्या बोकड  कळमडु (ता.चाळीसगाव) येथुन  चोरला व त्याची विक्री करण्यासाठी आज येथील बाजारात आणला.पोलिसाना हा प्रकार समजताच त्यांनी या तिघांना अटक करून त्यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुणबारे येथे दर शुक्रवारी बाजार भरतो. बाजारात गुरांसह शेळ्या, मेढ्या, बोकड मोठ्या प्रमाणावर विक्रीला येतात. सध्या परिसरात पाहीजे तसा  पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.अशातच कळमडु (ता.चाळीसगाव) येथील गोपाळ सोमा मासरे यांनी गावातील खंडेराव महाराज यांच्या नावाने देवाला बोकड सोडलेला होता मंगळवारी (ता.5 )अज्ञात चोरटय़ांनी हा बोकड चोरून नेला. याबाबत श्री मासरे यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसात केलेली  नव्हती. 

असे सापडले चोरटे
आज सकाळी दहाला येथील  बाजारपेठ भागात ड्युटीवर असलेले पोलिस कॉन्स्टेबल पंकज पाटील व दीपक पाटील यांना बोकड खरेदी करणाऱ्या व्यापार्याच्या ठिकाणी गर्दी दिसली. त्यांनी जाऊन विचारपूस केली असता,सुमारे वीस ते बावीस किलो वजनाचा बोकड अत्यंत कमी किमतीत विकत असल्याची आढळून आले. त्यामुळे काही व्यापार्यांनी हा बोकड चोरीचा असावा असा संशय व्यक्त केला.या बाजारात  कळमडु येथील काही ग्रामस्थ आलेले होते त्यांनी बोकड लगेचच  ओळखला व लगेच बोकड मालक गोपाळ मासरे यांना भ्रमणध्वनीवरून कळविले या दरम्यान  संजय भिका गायकवाड (रा. उंबरखेडे) भाईदास भिकन वाघ व कैलास अवचित वाघ  (दोघे रा. शिरूड ता.जि.धुळे) यांनी बोकड चोरल्याची कबुली दिल्यानंतर तिघांना अटक करून पोलीस ठाण्यात आणले. 

या भागात टोळी सक्रिय
परिसरात गेल्या काही दिवसापासुन गुरे बकऱ्या चोरीच्या घटनांचे प्रकार  प्रमाण कमालीचे वाढले आहे.दोन दिवसापुर्वीच मेहुणबारे - जामदा रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या म्हशी सोडुन घेवुन जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या ठीकाणी त्यांचे वाहन लावण्यास जागा नसल्याने त्यांनी तेथून पलायन केले. ही बाब सकाळी लक्षात आली.यापुर्वी देखील बकऱ्या चोरणाऱ्या मालेगाव येथील भामट्याना येथील ग्रामस्थांनी पकडुन दिले होते. त्यामुळे पोलिसांनी या टोळीचा म्होरक्याचा छडा लावावा व रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

दारू व्यसनामुळे बनले चोरटे 
या तिघांनाही दारूचे व्यसन जडले आहे. दारपिण्यासाठी त्यांनी आपापल्या घरातील भांडी देखील विकली आहेत. शंभर रूपयांची वस्तु ते  पन्नास रुपयामध्ये विकायचे या तिघांजवळ पैसे नसल्यामुळे ते  बेचैन झाले होते त्यामुळे  त्यांनी बोकड चोरून विकण्यास  सुरवात केली होती.दारू पिण्यासाठी पैसे लागत होते. असे पोलिस चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस हवालदार  पंकज पाटील यांनी दैनिक 'सकाळ' ला दिली.

रात्री अपरात्री कोणी अज्ञात वाहन किवा व्यक्ती कुठेही संशयास्पद फिरताना आढळून आल्यास तात्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.जेणेकरून चोरीच्या घटनांना आळा बसेल.तपासकामी ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे.
- दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक मेहुणबारे 

Web Title: Jalgaon news goat thief in chalisgaon