विशाल, प्राजक्‍ताने जिंकली ‘खानदेश रन’

जळगाव - ‘खानदेश रन’मध्ये धावताना क्रीडाप्रेमींसह जळगावकर.
जळगाव - ‘खानदेश रन’मध्ये धावताना क्रीडाप्रेमींसह जळगावकर.

जळगाव - जळगाव रनर ग्रुपतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘खानदेश रन’ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात आज पार पडली. तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेतील १० किलोमीटरचे अंतर पूर्ण करत पुरुष गटातून विशाल कुंवर आणि महिलांमधून प्राजक्ता गोडबोले यांनी ‘खानदेश रन’ स्पर्धा आपल्या नावावर केली.

जळगावात प्रथमच अशा प्रकारची ‘खानदेश रन’ ही मॅरेथॉन स्पर्धा जळगाव रनर ग्रुपतर्फे आज झाली. जळगावच नव्हे, तर खानदेशात रनिंगचे कल्चर वाढत असून, त्याचा अनुभव आजच्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या ‘खानदेश रन’मधून पाहण्यास  मिळाले. सागर पार्क मैदानावर संपूर्ण स्पर्धेचे आगळेवेगळे वातावरण पहाटेपासून होते. खानदेश रन स्पर्धा १०, ५ आणि ३ किलोमीटर अशा तीन गटांत घेण्यात आली. यात १० किलोमीटरची धाव सकाळी सहाला सुरू झाली. आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत खानदेश रनला सुरवात झाली. यानंतर सव्वासातला ५ किलोमीटर आणि आठला तीन किलोमीटरच्या रनला सुरवात झाली. यावेळी महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, माजीमंत्री सुरेशदादा जैन, माजी आमदार शिरीष चौधरी, कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सातपुडा ऑटोमोबाइल्सचे संचालक प्रा. डी. डी. बच्छाव, रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव, डॉ. रवी हिराणी आदी उपस्थित होते.

विशाल, प्राजक्‍ताची बाजी - सर्वांसाठी आकर्षण असलेल्या खानदेश रन मॅरेथॉनमध्ये १० किलोमीटरची धाव पुरुष गटातून विशाल कुंवरने ३४ मिनिटे ५ सेकंदात, तर महिलांमधून प्राजक्ता गोडबोलेने ४० मिनिटांत पूर्ण करत स्पर्धा जिंकली. स्पर्धेचे आकर्षण असलेल्या खानदेश कन्या क्रांती साळवी या देखील दहा किलोमीटरच्या ग्रुपमधून सहभाग घेऊन जळगावकरांसोबत धावल्या. त्या महिलांच्या ४६ वर्षांवरील गटात ५० मिनिटे १४ सेकंदात धाव पूर्ण करत प्रथम स्थानावर राहिल्या. तीनही ग्रुपमधील फिनिशर्सला मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले; तर विजेत्यांना रोख रकमेचा धनादेश व स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

विजयी स्पर्धक
दहा किलोमीटर - पुरुष गट (१८ ते ३५ वयोगट) - प्रथम- विशाल कुंवर, द्वितीय- जयेश चौधरी (३४.०८ मिनिटे), तृतीय- गणेश म्हस्के (३५.२५ मिनिटे). (३६ ते ५० वयोगट) - प्रथम- सारंग विंचूरकर, द्वितीय- रवींद्र बालपांडे, तृतीय- अनिल पठावडे. (५१ वर्षांवरील) - प्रथम- नागोराव भोवर, द्वितीय- माधव आंबेकर, तृतीय- संजय आंबेकर.

महिला गट (१८ ते ३० वयोगट) - प्रथम- प्राजक्‍ता गोडबोले, द्वितीय- अश्विनी कटोले (४५.०८), तृतीय- कांचन राठोड. (५६.३३), (३१ ते ४५ वयोगट) - प्रथम- श्रद्धा भवर, द्वितीय- कविता पाटील, तृतीय- आदिती महाजनी. (४६ वर्षावरील) ः प्रथम- क्रांती साळवी, द्वितीय- सुनीती आंबेकर, तृतीय- विद्या बेंडाळे.

पाच किलोमीटर - पुरुष गट (१८ ते ३० वयोगट) - प्रथम- प्रथमेश व्यवहारे, द्वितीय- राहुल पाटील, तृतीय- वीरेंद्र बारेला. (३६ ते ५० वयोगट) - प्रथम- ले. कर्नल मुरलीलाल, द्वितीय- सेप अटकले, तृतीय- दिलीप पाटील. 

महिला गट (१८ ते ३० वयोगट) - प्रथम- सुमित्रा वळवी, द्वितीय- नूतन शेवाळे, तृतीय- प्रतिभा मुळे, (३१ ते ४५ वयोगट) ः प्रथम- विभा कोटेचा, द्वितीय- भावना पाटील, तृतीय- रिया चोपडे, (४६ वर्षांवरील) ः प्रथम- क्रांती साळवी, द्वितीय- सुनीती आंबेकर, तृतीय- विद्या बेंडाळे.

तीन किलोमीटर - पुरुष गट - प्रथम- सक्षम भुटाळे, द्वितीय- ईश्‍वर पाटील, तृतीय- दीक्षित शिरसोडे. महिला गट - प्रथम- लता ढोले, द्वितीय- आशा पाटील, तृतीय- नितीन साळुंखे.

कृत्रिम पायांवर धावला सुशील शिंपी
जळगावातील रहिवासी व दोन्ही पायांनी अपंगत्व आल्यानंतरही कृत्रिम पाय बसवून मॅरेथॉन स्पर्धेत हिरिरीने सहभागी होऊन सुशील शिंपी यांनी तीन किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. २०११ मध्ये जळगाव रेल्वेस्थानकावर गाडीत चढताना अपघात होऊन सुशीलला दोन्ही पाय गमवावे लागले. अपघात होण्यापूर्वी सुशीलले १४ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. अपंगत्व आले म्हणून थांबला नाही, तर कृत्रिम पाय बसवून जिद्दीने उभा राहिला आणि आजच्या खानदेश रनमध्ये तीन किलोमीटरच्या रनमध्ये धावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com