चाळीसगाव: कन्नड घाटातील वाहतूक ठप्प

शिवनंदन बाविस्कर
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

दीड महिना वाहतूक ठप्प...
या संदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे औरंगाबाद विभागाचे प्रबंधक महेश पाटील यांना विचारले असता, रस्त्याच्या कामासाठी साधारणतः एक ते दीड महिना लागू शकतो. आम्ही रविवारी(ता. 20) घटनास्थळाची पाहणी केली व त्याचे अंदाजपत्र वरिष्ठांकडे पाठविले आहे. त्यानुसार पुढील कामकाजाला सुरुवात होईल.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : कन्नड घाट परिसरात रविवारी(ता. 20) सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सायंकाळी आठच्या सुमारास दरड कोसळली होती. यामुळे वाहतूक ठप्प झाली असून महामार्ग पोलिसांनी औरंगाबादकडे जाणारी वाहतूक नांदगावमार्गे वळवली असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी 'सकाळ'ला सांगितले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

कन्नड घाटात रविवारी(ता. 20) झालेल्या सततच्या पावसामुळे सायंकाळी साडेसात वाजेपासूनच या भागात ठिकठिकाणी दरडी कोसळू लागल्या होत्या. आठच्या सुमारास एक दरड कोसळली. कोसळल्या दरडीचे दगड रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या चारीत पडले. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले आणि म्हसोबाच्या मंदिरामागील रस्त्याचा भाग खचला. महामार्ग पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच दोन्ही कडील वाहतूक तत्काळ थांबवली.  दरड कोसळली त्यावेळी रस्त्यावर कुठलेही वाहन नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. सध्या औरंगाबादकडे जाणारी वाहतूक नांदगावमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

दीड महिना वाहतूक ठप्प...
या संदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे औरंगाबाद विभागाचे प्रबंधक महेश पाटील यांना विचारले असता, रस्त्याच्या कामासाठी साधारणतः एक ते दीड महिना लागू शकतो. आम्ही रविवारी(ता. 20) घटनास्थळाची पाहणी केली व त्याचे अंदाजपत्र वरिष्ठांकडे पाठविले आहे. त्यानुसार पुढील कामकाजाला सुरुवात होईल.

महामार्ग पोलिसांची सतर्कता...
घटनेची माहिती कळताच चाळीसगावच्या वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी महामार्ग पोलिसांशी संपर्क साधून दोन्ही बाजूकडील वाहतूक तत्काळ थांबवली. शिवाय रात्रभर पोलिसांनी त्या भागात गस्त ठेवली.  वेळीच वाहतूक थांबवली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती असे शिरसाठ यांनी 'सकाळ'ला सांगितले. 

Web Title: Jalgaon news landslide in kannad ghat chalisgaon