‘मयूरी’ करणार आशियाई क्रीडा सफर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

जळगाव-  ‘बेटी बचाओ’साठी अलीकडे सर्वत्र अभियान, मोहिमा, जनजागृती होताना दिसते. पण, यापूर्वीही अनेक कुटुंबांनी मुलींचाच सांभाळ करीत तिच्या पंखात बळ भरण्याचे काम केले आहे. असेच वंशाचा दिवा ही संकल्पना झटकत गचके कुटुंबीयांनी दोघी मुलींनाच वंशाची पणती बनवत त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला अन्‌ याच गचकेंच्या मुलीने क्रीडा क्षेत्रात भरारी घेत थेट आशियायी स्पर्धांपर्यंत सफर केली. त्यांच्या मयूरी या मुलीने ‘जिम्नॅस्टिक’, ‘स्पोर्टस एरोबिक’ खेळात प्रावीण्य मिळवीत एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. येत्या डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे. 

शेगाव येथील श्‍याम व नेहा गचके हे दांपत्य... श्‍याम गचके हे व्यवसायाने वकील, तर नेहा गचके या योग शिक्षिका आहेत. गचके दांपत्याने मयूरी व मधुरा या आपल्या दोन्ही मुलींना लहानपणापासूनच छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. आई योग शिक्षिका असल्याने तिला खेळ हा प्रकार अधिक आवडायचा. अभ्यासासोबतच मुलींनी काहीतरी छंद जोपासले पाहिजे यासाठी आईचा सतत आग्रह असे. त्यामुळे मयूरी व मधुरा दोघीही लहानपणापासूनच जिम्नॅस्टिक खेळायच्या. सुट्टीत त्या गावाला न जाता गायन शिकत असत.

वडील कोणता खेळ खेळत नसले, तरी ते पत्नीला व मुलींना खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत राहिले. मयूरीला खेळाची अधिक आवड असल्याने ती शालेय जीवनातही खेळात सहभागी होत असे. जिम्नॅस्टिक या खेळात शाळेत असताना तब्बल सात वेळेस राज्यस्तरीय खेळण्याची संधी मयूरीला मिळाली होती.  दरवर्षी खेळात सहभाग नोंदवत असल्याने खेळ हा मयूरीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. मात्र, शालेय शिक्षणानंतर तिने जळगावातील गोदावरी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला. या ठिकाणी तिने खुल्या स्पर्धेत सहभाग घेतला. आधी करिअर करायचे असल्याने मयूरी हिने राज्यस्तरावर सहभाग नोंदविला नाही. यानंतर करिअर व परिवार सांभाळत मयूरीने काही वर्षे स्पर्धेतून विश्रांती घेतली होती. मधल्या काळात मयूरीने ‘स्पोर्टस एरोबिक’ खेळाचा सराव केला व २०१६ मध्ये स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत सुरवातीला शिर्डी त्यानंतर गोवा येथे इंटरनॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेत खेळत गोल्ड व सिल्व्हर पदक प्राप्त केले. आता एशियन चॅम्पियनशीपसाठी मयूरी निवड झाली असून, तिला आजही परिवाराची मदत मिळत आहे.

सासरच्यांचे प्रोत्साहन
मयूरी हिचे जळगाव शहरातील शेलार परिवारात लग्न झाले असून, लग्नानंतरही पती आकाश व सासरचा संपूर्ण परिवार तिला खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. घर, परिवार, नोकरी व आपला खेळाचा छंद जोपासताना माहेर व सासर दोघांनी मयूरी हिला मुलांप्रमाणे प्रोत्साहन दिले आहे.

माय-लेकींचा एकत्र सहभाग
आई नेहा या सतत योगा स्पर्धेत सहभागी होत असतात. त्यांनी आपल्या दोन्ही मुलींनाही योगा शिकविला. त्यामुळे त्या देखील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असत. २०१४ साली कोलकता येथे झालेल्या योगा स्पर्धेत नेहा, मयूरी व मधुरा या तिन्ही माय-लेकींनी वेगवेगळ्या वयोगटातून सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत तिन्ही माय-लेकींची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती.

Web Title: jalgaon news mayuri gachake in championship competition involve