कुष्ठरोग विभागाच्या सहसंचालक डॉक्‍टरची जळगावात निर्घृण हत्या 

कुष्ठरोग विभागाच्या सहसंचालक डॉक्‍टरची जळगावात निर्घृण हत्या 

जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयात कुष्ठरोग विभागाचे प्रमुख तथा आरोग्य सेवा विभागाचे सहायक संचालक म्हणून नुकताच पदभार घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. डॉ. अरविंद सुपडू मोरे (वय 52) असे त्यांचे नाव असून, गळा चिरलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. 

मूळचे दाभाडी (जि. नाशिक) येथील रहिवासी डॉ. अरविंद मोरे यांनी याआधी नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून व नंतर कोल्हापूर, धुळे येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर नुकतीच त्यांची जळगावी बदली झाली होती. शहरातील पार्वतीनगर रस्त्यावरील प्लॉट क्रमांक 3 मध्ये "श्रीराम' नामक घरात पहिल्या मजल्यावरील खोलीत किरायाने राहत होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांचे वाहनचालक जालीम जाधव हे त्यांना घेण्यासाठी घरी आले. आवाज देऊन, फोन लावूनही डॉ. मोरेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जाधव हे पहिल्या मजल्यावर गेले असता डॉ. मोरे यांचा मृतदेह दरवाजात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. 

खून की आत्महत्या? 
रविवारी दुपारी डॉ. मोरेंना खोलीची खिडकी बंद करताना पाहण्यात आले. त्यानंतर ते बाहेर निघाले नाहीत. त्यांच्या खोलीत जाताना परिसरातील नागरिक अथवा खाली राहत असलेल्या घरमालकांनी कुणालाही पाहिले नाही. घरची स्थिती चांगली व काही तणाव नसताना ते आत्महत्या का करतील आणि स्वभावही मितभाषी असल्याने त्यांची हत्या कुणी कोणत्या कारणासाठी करेल? असे प्रश्‍न उपस्थित होत असले तरी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com