‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण आश्‍वासनाअंती मागे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबाबत आक्षेपार्ह फलक लावल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षकांनी ठोस कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले.

गेल्या मे महिन्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जिल्हा दौऱ्यावर आले असता अज्ञात व्यक्तीने शासकीय विश्रामगृहाजवळ राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची छायाचित्रे व आक्षेपार्ह मजकूर असलेला फलक लावला होता. याप्रकरणी पक्षाने कारवाईच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्तांना दिले. मात्र, त्यानंतरही कारवाई झाली नाही म्हणून पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे गणेश नन्नवरे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू झाले. मात्र, उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन कारवाईचे आश्‍वासन दिले. त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री गुलाबराव देवकर, महापालिकेतील गटनेते सुरेश सोनवणे, रवींद्र मोरे, लता मोरे आदी उपस्थित होते.