कांदाचाळ अनुदानापासुन शेतकरी वंचित

दीपक कच्छवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

तालुका कृर्षीविभागात 16 पदे रिक्त 
तालुका कृर्षीविभागात सद्यासिथ्तीत  विविध पदासोबत  तांत्रिक सल्लागार समितीचे महत्वाचे पद रिक्त आहे.याशिवाय  कृर्षीसाहाय्यक, कृर्षीपर्येवेशक, सुपरवायझर असे विविध 16 पदे रिक्त आहे.त्यामुळे आहे त्या कर्मचार्यावर कामाचा ताण वाढल्याचे दिसून येत आहे.परिणामी तालुका कृषी कार्यालयात गेल्यानंतर शेतकर्यांची वेळेवर कामे होत नसल्याचाही अनुभव अनेकांना आला आहे.त्यामुळे येथील    रिक्त पदे तातडीने भरावीत आशी मागणी होत आहे.

मेहुणबारे(ता.चाळीसगाव) : कांदाचाळ उभारणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत लकी ड्राॅ मध्ये गतवर्षी देण्यात आलेल्या अनुदांनाचा 35 शेतकर्याना लाभ मिळाला होता.त्यामुळे 530 शेतकरी वंचित राहीले असुन या  लाभार्थीना लवकरात लवकर अनुदान मिळावे आशी मागणी होत आहे. 

कांदाचाळ उभारणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत लकी ड्राॅ मध्ये मागील वर्षी  देण्यात आलेल्या अनुदांनाचा 35 शेतकर्याना लाभ मिळाला व  565 शेतकरी वंचित राहीले असुन या  लाभार्थीना लवकरात लवकर अनुदान मिळावे आशी मागणी होत आहे. 

तालुका कृषी कार्यालयाकडे 2016- या वर्षासाठी कांदाचाळ अनुदानासाठी 565  अर्ज प्राप्त झाले होते.त्याचा लकी ड्रॉ काढण्यत आल्यानंतर त्यात केवळ 33 शेतकर्यांनाच लाभ मिळाला होता.त्यानुसार 87 हजार 500 रूपये प्रमाणे सुमारे  28 लाख 87 हजार 500 रूपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. गतवर्षीही 527 शेतकरी या लाभापासून वंचित राहीले.बाजारभावातील सततची होणारी चढ-उतार लक्षात घेऊन कांद्याची योग्यरित्या साठवणूक करण्यासाठी शेतकर्यानी अर्ज केले होते.सद्यासिथीतीत बहुतांश शेतकर्याकडे त्यांचा कांदा उत्पादित झाल्यानंतर तो साठवून ठेवण्यासाठी चाळीसारख्या सुविधा नाहीत.परिणामी अनेकांची ईच्छा नसतानाही मातीमोल भावात कांदा विकावा लागला आहे. आशातच ज्या शेतकर्याना आहे त्या परिस्थितीत कसाबसा कांदा सांभाळुन ठेवला आहे.तो पावसाच्या तडाख्यात सापडल्याने मोठे नुकसान सोसावे लागले आहे. एकीकडे शासनाकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा चाळ घेण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे ज्यांनी रितसर अर्ज करून मागणी केलेली आहे.त्यांना लाभच मिळत नाही.

कांदाचाळ उभारणीचे गणित
वर्षभरात खरीप व  लेट खरीप (रांगडा) आणि उन्हाळ (लाल) या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळ कांद्याचे आयुर्मान इतर कांद्यांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे त्याची साठवणूक करता येते.एप्रिलपासून सुरू होणारा कांदा सप्टेंबर व कधीकधी ऑक्टोबपर्यंत बाजाराची गरज भागवितो. या वर्षी चांगला भाव मिळेल या आशेने साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अखेपर्यंत भावात सुधारणा झाली नाही. याचा अपवाद वगळता साठवणुकीचा लाभ होत असल्याचे शेतकरी सांगतात. एक  टन कांदा साठवणुकीची व्यवस्था करण्यासाठी साधारणपणे सात हजार रुपये खर्च येतो.यातील निम्मे म्हणजे तीन हजार पाचशे रुपये प्रति टन शासनाकडून या योजनेंतर्गत अनुदान दिले जाते. 

सरसकट अनुदानाची मागणी
चालु वर्षी 2017- 18 मध्ये 515 शेतकर्यांनी कादांचाळीच्या अनुदानासाठी अर्ज केले आहेत. त्याचा  लकी ड्रॉ अजुनही निघालेला नाही.तो काढला तरी  110 शेतकर्यानाच लाभ होणार असल्याने  यावर्षी 405 शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने अनुदान सरसकट  द्यावे आशी मागणी होत आहे. लकी ड्रॉ पध्दतीत ज्या शेतकर्याला खरोखर गरज आहे.त्याला लाभ  मिळेलच असे  नाही.त्यामुळे लकी ड्रॉ ची पध्दतच बंद करावी, असाही सुर शेतकर्यामधुन उमटत आहे. 

तालुका कृर्षीविभागात 16 पदे रिक्त 
तालुका कृर्षीविभागात सद्यासिथ्तीत  विविध पदासोबत  तांत्रिक सल्लागार समितीचे महत्वाचे पद रिक्त आहे.याशिवाय  कृर्षीसाहाय्यक, कृर्षीपर्येवेशक, सुपरवायझर असे विविध 16 पदे रिक्त आहे.त्यामुळे आहे त्या कर्मचार्यावर कामाचा ताण वाढल्याचे दिसून येत आहे.परिणामी तालुका कृषी कार्यालयात गेल्यानंतर शेतकर्यांची वेळेवर कामे होत नसल्याचाही अनुभव अनेकांना आला आहे.त्यामुळे येथील    रिक्त पदे तातडीने भरावीत आशी मागणी होत आहे.

जे शेतकरी कादांचाळीच्या  अनुदानापासुन वंचित राहीले त्यांनी चालु वर्षात पुन्हा अमच्याकडे अर्ज सादर केले  आहेत. शासनाच्या निमनुसार कांदाचाळ अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
- आर.एस.राजपुत, तालुका कृर्षीअधिकारी, चाळीसगाव

Web Title: Jalgaon news onion in chalisgaon