पुण्यातील फ्लॅट खरेदीचा वाद जिल्हापेठ पोलिस ठाण्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जळगाव - शहरातील व्यापाऱ्याने पुण्यात फ्लॅट खरेदीसाठी मध्यस्थामार्फत ५६ लाखांची तोंडी बोलणी करून १५ लाख रुपये मालकाच्या खात्यावर वर्ग केले. उर्वरित रक्कम खरेदीच्या वेळी दिली जाणार होती. मात्र, मालकाने फ्लॅटची किंमत ९० लाख ठरल्याचे सांगितल्याने खरेदीदार व्यापारी व फ्लॅटमालक यांच्यातील वाद विकोपाला जाऊन थेट जिल्हापेठ पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद तात्पुरता मिटविण्यात आला. दरम्यान, यावेळी तक्रारदार व्यापारी अपघातग्रस्त असल्याने कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून पोलिस ठाण्यात आणले. 

जळगाव - शहरातील व्यापाऱ्याने पुण्यात फ्लॅट खरेदीसाठी मध्यस्थामार्फत ५६ लाखांची तोंडी बोलणी करून १५ लाख रुपये मालकाच्या खात्यावर वर्ग केले. उर्वरित रक्कम खरेदीच्या वेळी दिली जाणार होती. मात्र, मालकाने फ्लॅटची किंमत ९० लाख ठरल्याचे सांगितल्याने खरेदीदार व्यापारी व फ्लॅटमालक यांच्यातील वाद विकोपाला जाऊन थेट जिल्हापेठ पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद तात्पुरता मिटविण्यात आला. दरम्यान, यावेळी तक्रारदार व्यापारी अपघातग्रस्त असल्याने कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून पोलिस ठाण्यात आणले. 

महात्मा गांधी मार्केटमध्ये अशुतोष शेट्टी यांचे दुकान आहे. त्यांची दोन्ही मुले पुणे येथे शिक्षणासाठी वास्तव्याला आहेत. ही मुले ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती, त्याच इमारतीत कर्नल कुणाल जैन (मूळ रा. आग्रा) यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. जैन आग्रा येथे आपल्या मूळ गावी राहायला गेल्याने त्यांनी फ्लॅट विक्रीला काढला होता. अपार्टमेंटमधीलच ‘डेझी मॅम’ यांच्या मध्यस्थीने तो विक्री करण्यात येणार होता. त्यामुळे त्यांनी भाड्याने राहत असलेल्या शेट्टी यांच्या कुटुंबीयांना फ्लॅट विक्रीबाबत सांगितल्यानंतर तोंडी व्यवहार झाला. शेट्टी कुटुंबीयांनी फेब्रुवारी महिन्यात कुणाल जैन यांना पंधरा लाख रुपयांचा ड्राफ्ट पाठवून पैसे दिले. उर्वरित रक्कम खरेदीच्या वेळी दिली जाणार होती. पंधरा लाख दिल्यावर जैन यांनी ज्यादा पैशांची मागणी केली. मात्र शेट्टी यांनी तो फ्लॅट ४९ लाखांचा असल्याचे समजून व्यवहार केल्याचे व त्याच दराने पैसे देऊन खरेदीची मागणी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. व्यवहार होत नसल्याने व फ्लॅटचा ताबाही मिळत नसल्याने प्रकरण पोलिसांत पोचले. 

मध्यस्थ महिलेशी बोलणे झाले
या प्रकरणात फ्लॅट व्यवहारात मध्यस्थी असलेल्या डेझी या महिलेने ज्या दरात फ्लॅट सांगितला, ते आम्ही मान्य केले. त्यानुसारच पैसे दिले गेले आहे, असे शेट्टी कुटुंबीयांनी सांगितले. आजही आम्ही त्या दराने खरेदीला तयार आहोत, असे शेट्टी कुटुंबीयांनी चर्चेदरम्यान सांगितले. 

पंधरा दिवसांची मुदत 
झालेल्या व्यवहारात केवळ तोंडी बोलणे होऊन त्या आधारे पंधरा लाख रुपये कर्नल कुणाल जैन यांना दिले गेले आहे. दोघांचे नेमके बोलणे आणि व्हॉट्‌सॲपवरून झालेल्या चर्चेचा तपशील तपासला गेला आहे. दोन्ही पक्षांनी आपसांत प्रकरण मोडण्यासाठी तयारी दर्शवली असून गरज पडल्यास त्या, मध्यस्थी (डेझी) महिलेलाही बोलविले जाईल. तूर्तास शेट्टी यांच्यावर उपचार सुरू असल्याने पंधरा दिवस दोन्ही पक्षाने मुदत मागून घेतली आहे. त्यानंतर प्रकरण आपसांत मिटले नाही तर कायदेशीर मार्ग खुले आहेत, असे तपासाधिकारी, सहाय्यक फौजदार शिवाजी वराडे यांनी सांगितले.

तक्रारदार रुग्णवाहिकेतून थेट पोलिस ठाण्यात
शेट्टी यांनी कुणाल जैन यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिला होता. मात्र, त्याच दरम्यान शेट्टी यांचा २९ जुलैला त्यांचा औरंगाबादला जाताना गाडेगाव घाटात भीषण अपघात झाला. यात त्यांना अपंगत्व आल्याने तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल आहेत. अधिकारी शिवाजी वराडे यांनी तक्रारअर्जाच्या चौकशीसाठी आज कुणाल जैन यांना बोलविले होते. त्यामुळे जैन आज जळगावात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आले होते. पोलिसांना नेमके प्रकरण समजावे म्हणून शेट्टी कुटुंबीयाने थेट ‘बेडरेस्ट’वर असलेल्या अशुतोष शेट्टी यांना रुग्णवाहिकेतून पोलिस ठाण्यात आणले.

Web Title: jalgaon news pune flat purchase controversy in district police station