पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी बलिप्रतिप्रदेस राज्यभर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कर्जमाफी, हमीभाव मागणीकरीता जळगावात राज्यस्तरीय शेतकरी परिषद

जळगाव: शासनाची कर्जमाफी योजना फसवी असून, या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा (कलम 302 व 306 अन्वये) दाखल करण्यासाठी बलिप्रतिपदेस राज्यभर गावागावांत आंदोलन छेडण्यात येईल. तसेच नोटाबंदीच्या निर्णयाने देशाचे आर्थिक कंबरडे मोडले असून 8 नोव्हेंबरला या निर्णयाचे श्राद्ध घालण्याचा ठराव आज (मंगळवार) जळगावात शेतकरी कर्जमाफी व हमीभावासाठी आयोजित राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत करण्यात आला.

शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात आज शेतकरी कर्जमुक्‍ती व हमीभाव शेतकरी परिषद घेण्यात आली. सदर परिषदेस मराठा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. तर खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, शेतमजूर कामगार परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, डॉ. अजित नवले, किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, कॉ. किशोर ढमाले, शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्या सुशीलाताई मोराळे, नामदेव गावळे, प्रतिभा शिंदे, सचिन धांडे आदी उपस्थित होते. कर्जमाफीची नुसती घोषण करून शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवत फसवणूक केली आहे, असा आरोप यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्‍त करताना केला.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासाठीही यापुढे देखील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करत बळीराजाला पुढच्या काळात दाद दिली नाही, तर पंढरीची वारी नाही पण जेलची वारी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच 20 नोव्हेंबरला दिल्लीतील रामलिला मैदानावर देशभरातील शेतकऱ्यांतर्फे पंतप्रधान मोदींनी गुडघे टेकावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल असाही महत्त्वपूर्ण ठराव राज्यव्यापी शेतकरी परिषदेत करण्यात आले.

Web Title: jalgaon news State Farmers Council and government