चाळीसगाव: 'गिरणा'तील साठ्यात पिण्याचे आरक्षण पूर्ण

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

मन्याडमध्ये ठणठणाट...
चाळीसगाव तालुक्यातील मोठे धरण असलेल्या मन्याडमध्ये अजूनही ठणठणाट आहे. धरणात केवळ 281 दशलक्ष घनफुट एवढाच मृतपाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती धरणाचे सहायक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. दरम्यान 'गिरणा'प्रमाणेच मन्याड धरण क्षेत्रात दमदार पाऊस होऊन धरण 'ओव्हरफ्लो' व्हावे अशी अपेक्षा होत आहे.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : पाण्याची आवक नसल्यामुळे गिरणा धरणाची पाणी पातळी स्थिरावली होती. मात्र काही दिवसांपूर्वी पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या कमी अधिक पावसामुळे गिरणाच्या साठ्यात हळूहळू वाढ होत 52 वरून 54 टक्क्यांवर साठा गेला आहे. याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे आरक्षणही पुर्ण झाल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे गिरणाच्या साठ्यात सुरुवातीपासूनच चांगली वाढ होत आहे. मात्र, सध्या पाऊस थांबल्याने पुन्हा धरणात पाण्याची आवक बंद झाली. त्यामुळे पाणीसाठ्यात पाहिजे तशी वाढ झाली नाही. गेल्या वर्षीचा धरणात 26 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यात यंदा चणकापूर, पुनद, हरणबारी, केळझर या धरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे गिरणात चांगली आवक आली. या धरणांच्या कॄपेमुळे धरण 54 टक्क्यांवर जाऊ शकले. कारण धरण क्षेत्रात अद्यापही अपेक्षित असा जोरदार पाऊस झालेला नाही. धरणात सध्या पाण्याची आवक बंद झाली असून आज सकाळपर्यंत 10 हजार 95 दशलक्ष घनफुट जिवंत पाणीसाठा निर्माण झाला असून 54.57 टक्के साठा झाला आहे.

पिण्याच्या पाण्याचे आरक्षण पूर्ण...
धरणात सध्या उपलब्ध असलेल्या साठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण पुर्ण झाले आहे. यामुळे वर्षभर तरी पिण्याच्या पाण्याची अडचण उद्भवणार नाही, असे श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावरुन सिंचनासाठी रब्बीत एक किंवा दोन  आवर्तन देता येऊ शकते अशी स्थिती आहे. मात्र अद्याप पावसाळा संपला नसल्याने अजून धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. त्यामुळे धरण व पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होऊन धरणाने यंदा तरी शंभरी गाठून 'ओव्हरफ्लो' व्हावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

मन्याडमध्ये ठणठणाट...
चाळीसगाव तालुक्यातील मोठे धरण असलेल्या मन्याडमध्ये अजूनही ठणठणाट आहे. धरणात केवळ 281 दशलक्ष घनफुट एवढाच मृतपाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती धरणाचे सहायक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. दरम्यान 'गिरणा'प्रमाणेच मन्याड धरण क्षेत्रात दमदार पाऊस होऊन धरण 'ओव्हरफ्लो' व्हावे अशी अपेक्षा होत आहे.

'गिरणा'च्या वरील धरणांमधील साठा...
चणकापूर........ 80.18 %
पुनद............... 87.51%
हरणबारी......... 100%
केळझर............100%
नाग्यासाक्या....0%

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ठाणे अंमलदाराकडून तक्रार दाखल करून घेतली जाईलच याची खात्री नसते....

01.27 AM

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017