चार विद्यार्थ्यांमागे एकाला जडते व्यसन!

राजेश सोनवणे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कायदा अंमलबजावणीकडे दुर्लक्ष; तंबाखूजन्य पदार्थ अल्पवयीन मुलांना देण्यावर बंदी

जळगाव - तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी नाही. जगात रोज साडेपाच हजार नवीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे आठवी ते दहावीतील चार विद्यार्थ्यांमागे एकाला व्यसन जडत असल्याचे चित्र आहे.

तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या अनुषंगाने शाळा किंवा शाळेच्या दोनशे मीटरपर्यंतच्या आवारात गुटखा- तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. शिवाय शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य मुक्‍त शाळा असल्याचे फलक बंधनकारक आहे. तसेच अठरा वर्षांखालील मुलांना हे पदार्थ देणे कायद्याने गुन्हा आहे. त्याचप्रमाणे ज्युवेनाईल जस्टिस ॲक्‍ट ७७ नुसार तंबाखूजन्य पदार्थ अल्पवयीन मुलांना देण्यावर बंदी आहे. असे करणाऱ्यास ५० हजार रुपये दंड व तीन वर्षे कारावासाची शिक्षा आहे. परंतु याची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली पाहण्यास मिळत नाही.
चार विद्यार्थ्यांमागे एकाला जडते व्यसन!

नऊ शाळांसमोर सर्वाधिक विक्री
शाळा किंवा शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असताना बहुतांश शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा समोर विक्री होताना दिसून येते. यात शहरातील नऊ शाळा- महाविद्यालय परिसरात सर्वाधिक विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात मु.जे. महाविद्यालय, ला. ना. विद्यालय, नंदिनीबाई विद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, आर. आर. विद्यालय, मनपा चौबे शाळा, मनपा शाळा क्रमांक १ शिवाजीनगर याठिकाणी अधिक विक्री होताना दिसते. यामुळेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. याकडे जिल्हा प्रशासन व शालेय समितीने लक्ष देणे गरजेचे आहे.

शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी या कायद्याची कोठेही अंमलबजावणी होत नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यात वाढ होत आहे. याकरिता गतवर्षी जिल्हा परिषदेच्या एक हजार ७९६ शाळांमध्ये याबाबतचे फलक लावण्याचे काम केले आहे.
- डॉ. गोविंद मंत्री, प्रचारक, तंबाखूजन्य अभियान

राज्यात ३१.४ टक्‍के नागरिक करतात तंबाखूजन्य पदार्थ सेवन
जगात दररोज नवीन साडेपाच हजार विद्यार्थी व्यसनाधीन
जळगाव शहरातील नऊ शाळांबाहेर सर्वाधिक विक्री
आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रमाण अधिक