‘मनपा’ कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’; सहाव्या आयोगाचा फरक मिळणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

जळगाव - महापालिका कर्मचारी संघटनेतर्फे काही दिवसांपासून सहावा वेतन आयोगांतर्गत फरकाची रक्कम मिळावी, अशी मागणी केली जात होती. संबंधित मागणी पूर्ण करीत ही रक्कम पगारासोबतच रोख स्वरूपात देण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने मान्य केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

महापालिका कामगार संघटनेतर्फे काही महिन्यांपासून सहावा वेतन आयोगांतर्गत फरकाची रक्कम देण्याची मागणी महापालिका प्रशासन तसेच पदाधिकाऱ्यांकडे केली जात होती. याबाबत नुकत्याच झालेल्या महासभेत संबंधित रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच रोखीने देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच याची अंमलबजावणी त्वरित करण्याची सूचना महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली. त्याप्रमाणे आयुक्तांनी फरकाची रक्कम रोखीने (जुलै २०१७) पगारासमवेत समान तीस हप्त्यांत देण्याचे आदेश दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष पी. जी. पाटील, जगदीश भावसार, के. टी. कोळी, विलास भाकरे, पी. के. पवार, सुभाष मराठे आदी पदाधिकारी, अधिकारी यांनी या निर्णयाचे पत्रकाद्वारे आभार मानले आहेत.