खाण्याची नैसर्गिक प्रक्रिया ‘ब्रेक’ केल्याने आजार - डॉ. अविनाश सावजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

जळगाव - आपण कशासाठी खायचे हे विसरलो असून, त्याची जाणीव करणे शरीराची गरज आहे. मुळात शरीराला ज्यावेळी साखरेची आवश्‍यकता भासते, त्यावेळी खाणे योग्य असते. म्हणजे भूक लागली तरच खायला हवे. ही खाण्याची नैसर्गिक प्रक्रिया ‘खंडित’ करीत कोणी आग्रह करतो म्हणून किंवा आवडते आहे म्हणून खात असतात. खाण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया मानवाने खंडित केल्याने आजाराला निमंत्रण मिळते, असे डॉ. अविनाश सावजी यांनी आज येथे सांगितले.

(कै.) वैद्य भालचंद्र शंकर जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे आज भय्यासाहेब गंधे सभागृहात ‘चढा आरोग्याची पायरी, टाळा जंकफूड- फास्टफूडची न्याहरी’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. सुरवातीला दीपप्रज्वलन व धन्वंतरीपूजन झाले. याप्रसंगी डॉ. राजेश पाटील, वैद्य जयंत जहागीरदार उपस्थित होते. रसिका जोशी हिने धन्वंतरी स्तवन केल्यानंतर व्याख्यानाला सुरवात झाली.

डॉ. सावजी म्हणाले, की प्रत्येक मनुष्य जीवनात खाण्यासाठी किमान ९० हजार वेळा तोंड उघडत असतो. इतक्‍या वेळी तोंड उघडल्याने एक सवय झाली असतानाही आपण कशासाठी खातोय, याचा विसर मनुष्याला पडला आहे. या प्रक्रियेतील ‘का’ असा विचार मनुष्य करीत नाही. म्हणजेच माणूस ‘का’ प्रश्‍न विसरला म्हणजे जगण्याचे विसरत जात आहे. तसेच आज प्रत्येक गोष्टीत कमी वेळेत जास्त इनपूट असे समीकरण झाले आहे. तेच खाण्यातही वापरले जात असल्याने याबाबत ते त्रासदायक आहे. यामध्ये जंकफूड- फास्टफूडचा वापर अधिक होत असतो. खाण्यातील कोणताही पदार्थ शंभर टक्‍के वाईट आहे, असे नाही; पण त्याचे प्रमाण अधिक होत असल्याने अनेक आजारांना शरीरात स्थान दिले जात आहे. ‘जंक’ म्हणजे ‘भंगार’ आणि ‘फास्ट’ म्हणजे ‘वेगाने’ असा सरळ अर्थ होत असतानाही खाण्यात ‘जंक- फास्टफूड’चे प्रमाण अधिक आहे. यामुळेच शरीर कचराकुंडी झाली आहे. इतकेच नव्हे, तर भारतात ६० टक्‍के लोक वजनदार असून, वजन कमी असलेल्या मुलांच्या मृत्यूपेक्षा वजनदार व्यक्‍तींचे मृत्यू अधिक होत असल्याचे डॉ. सावजी यांनी सांगितले. अमोल जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ठाणे अंमलदाराकडून तक्रार दाखल करून घेतली जाईलच याची खात्री नसते....

01.27 AM

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017