प्रवाशाच्या ऑनलाइन तक्रारीची एसटी महामंडळाकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

जळगाव - राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांनी हात देऊनही बऱ्याचदा थांबविली जात नसल्याचा प्रकार पाहण्यास मिळतो. असाच प्रकार आज घडल्याने संबंधित प्रवाशाने महामंडळाच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार टाकल्याने त्याची विभागीय कार्यालयाकडून दखल घेत चालक व वाहकाची सुनावणी घेत त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महामंडळाने ‘हात दाखवा, बस थांबवा’ अभियान राबविले आहे; परंतु अनेक चालक बसथांब्यावर प्रवासी असताना आणि प्रवाशांनी हात देऊनही बस न थांबविता सुसाट नेली जाते. असाच प्रकार आज घडला असून, जळगावहून चोपडा बस प्रवाशाने हात देऊनही चालक सोपान सपकाळे यांनी थांबविली नाही. यावरून श्री. राजपूत यांनी महामंडळाकडे ऑनलाइन तक्रार नोंदविली. या तक्रारीची जळगाव विभागीय कार्यालयाकडून दखल घेत संबंधित चालक सपकाळे व वाहक काळुंखे यांची सुनावणी विभागीय वाहतूक अधिकारी श्री. धायडे, जळगाव स्थानकप्रमुख नीलिमा बागूल यांनी घेतली असता, याबाबत चालक व वाहकाकडून अहवाल मागविला आहे.