'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या ज्ञानपर्वासाठी तरुणाई सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

जळगाव - तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात "यिन'च्या वतीने मंगळवारपासून (ता. 6) सलग तीन दिवस होणाऱ्या "समर यूथ समिट' या ज्ञानपर्वासाठी खानदेशातील तरुणाई सज्ज झाली आहे. "यिन'च्या "चला घडूया देशासाठी...' संकल्पनेतून साकारत असलेल्या या निवासी शिबिराचे उद्‌घाटन मंगळवारी सकाळी अकरा वाजता होत आहे.

जळगाव - तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात "यिन'च्या वतीने मंगळवारपासून (ता. 6) सलग तीन दिवस होणाऱ्या "समर यूथ समिट' या ज्ञानपर्वासाठी खानदेशातील तरुणाई सज्ज झाली आहे. "यिन'च्या "चला घडूया देशासाठी...' संकल्पनेतून साकारत असलेल्या या निवासी शिबिराचे उद्‌घाटन मंगळवारी सकाळी अकरा वाजता होत आहे.

स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रस्तुत व नीलया ग्रुप ऑफ एज्युकेशन पॉवर्ड बाय असलेल्या या शिबिरात विद्यापीठातील अधिसभा सभागृहात सलग तीन दिवस तरुणांशी विविध विषयांवर विचारमंथन होणार असून, राज्यासह खानदेशातील तज्ज्ञ आपापल्या क्षेत्रातील यशाबद्दल तरुणांना मार्गदर्शन करतील. शिवाय, तरुणांना या तज्ज्ञांशी संवाद साधण्याची, त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याची संधीही यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.

शिबिराचे उद्‌घाटन महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते होईल. कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील उद्‌घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. उद्‌घाटन सत्रानंतर लगेच "प्रशासनातून देशसेवा' या विषयावर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे मार्गदर्शन करतील.

"सकाळ- यिन'च्या या अनोख्या शिबिराला स्थानिक पातळीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहआयोजकत्व लाभले आहे. खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व धनाजी नाना विद्या प्रबोधिनी यांच्या विशेष सहकार्याने होत असलेल्या या "समिट'मध्ये उद्योग, व्यवसाय, राजकारण, डिजिटल- ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, क्रीडा, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर स्वतंत्र सत्रांमध्ये चर्चा होईल.

पहिल्या दिवसाचे सत्र
सत्र 1 - उद्‌घाटन समारंभ
सत्र 2 - प्रशासनातून देशसेवा (सहभाग : जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषद सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे)
सत्र 3 - टीम बिल्डिंग (मार्गदर्शक : सुनील पाटील, सीईओ, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी)
सत्र 4 - राजकारण : वक्तृत्व, नेतृत्व आणि संघटन (मार्गदर्शक : अरुणभाई गुजराथी, एकनाथराव खडसे, गुलाबराव पाटील)
सत्र 5 - गप्पा कलावंतांशी (सहभाग : शंभू पाटील, डॉ. अपर्णा भट, रमाकांत सूर्यवंशी)

आयोजक : सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क
सहआयोजक : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
विशेष सहकार्य : खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी