बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

जळगाव जामोद/रिसोड - वऱ्हाडातील शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढतच आहे. सततची नापिकी व कर्जाला कंटाळून बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्‍यात आणि वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्‍यात आज दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोपान समाधान सातव (रा. अकोला खुर्द, ता. जळगाव जामोद), शंकर निवृत्ती रेखे (रा. आसेगाव पेन ता. रिसोड) अशी त्यांची नावे आहेत. डोक्‍यावरील कर्ज व सततची नापिकी, अपंग आई-वडील व कुपोषित मुलांचा सांभाळ कसा करावा या विवंचनेत अकोला खुर्दचे सोपान समाधान सातव होते.