भुयारी गटारींची चौथ्यांदा निविदा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

जळगाव - शहरास अमृत योजनेंतर्गत मंजूर झालेल्या भुयारी गटारींच्या कामांची निविदाप्रक्रिया चौथ्यांदा राबवूनदेखील प्रतिसाद मिळत नाही. निविदाप्रक्रियेची आज मुदत संपली; परंतु प्रतिसाद न आल्याने पुन्हा २८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ केली आहे.

जळगाव - शहरास अमृत योजनेंतर्गत मंजूर झालेल्या भुयारी गटारींच्या कामांची निविदाप्रक्रिया चौथ्यांदा राबवूनदेखील प्रतिसाद मिळत नाही. निविदाप्रक्रियेची आज मुदत संपली; परंतु प्रतिसाद न आल्याने पुन्हा २८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ केली आहे.

शासनाच्या अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी २५० कोटींची योजना तसेच भुयारी गटारींची १३१ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे शहरात पाणीपुरवठा योजना भुयारी गटारीचे काम एकाच वेळी सुरू होणार आहे. परंतु पाणीपुरवठा योजना ही न्यायप्रविष्ट बाब असल्याने अजून निकाल लागलेला नाही. भुयारी गटारीच्या कामांसाठी महापालिका चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी राबविलेल्या प्रक्रियेत केवळ दोन निविदा आल्या होत्या. त्यामुळे चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबविली असून, त्याची देखील मुदत वाढविण्यात आली आहे.

‘मनपा’चे ग्रहण कधी सुटणार?
आर्थिक परिस्थिती नसलेल्या महापालिकेस पाणीपुरवठा योजनेसाठी २५० कोटी व भुयारी गटारासाठी १३० कोटी म्हणजे जवळपास ३८० कोटीचे कामे शहरात होणार आहे. पाणीपुरवठा योजनेच्या निवड केलेल्या मक्तेदाराच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेऊन न्यायालयाने काम सुरू करण्यास स्थगिती दिली आहे. अद्याप न्यायालयाने या योजनेबाबत निकाल दिला नसून निधी परत जाण्याकडे असल्याचे दिसत आहे. त्यात भुयारी गटारीच्या कामांसाठी देखिल निविदा येत नसल्याने महापालिकेचे ग्रहण कधी सुटणार, हा प्रश्‍न आता पडलेला आहे. 

मुदत वाढवूनही प्रतिसाद नाही
भुयारी गटारीच्या १३१ कोटींच्या कामांसाठी तीनदा यापूर्वी निविदाप्रक्रिया राबविली. त्यात केवळ दोन निविदा प्राप्त झाल्या असल्याने २८ ऑगस्टपर्यंत निविदांसाठी मुदतवाढ केली असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले यांनी दिली.  

Web Title: jalgav news underground dranage tender