तापमान ३९ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

जळगाव - गेल्या दोन आठवड्यांपासून चाळीस अंशांच्या वर असलेले तापमान आज काहीअंशी खाली आले आहे. दोन- तीन दिवसांपासून पारा ४१ अंशांवर स्थिर असताना कालपासून हवेत काहीसा गारवा आल्याने तापमान दोन अंशांची घसरण होऊन ३९ अंशांवर आले आहे. 

मार्चअखेरपासून जळगावातील तापमानाने उच्चांक गाठला होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारा ४४ अंशांवर पोहोचला होता. आठवडाभरापासून तापमान ४१- ४२ अंश सेल्सिअस असेच कायम होते. तापमानात सतत वाढ होत असल्याने उन्हाच्या तीव्र झळा असह्य होऊ लागल्या होत्या. परंतु काल (ता. ७) सायंकाळपासून हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. आज सकाळी तर थोडी थंडी जाणवत होती. यामुळे उन्हाची तीव्रतादेखील कमी जाणवत असल्याने तापमान दोन अंशांनी खाली येऊन ३९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

Web Title: jalgav temperature 39 degree