कर्जबाजारी शेतकऱ्याची मोरगाव येथे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

जामनेर - कर्जाला कंटाळून मोरगाव तांडा (ता. जामनेर) येथील पन्नास वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आज आत्महत्या केली. याबाबत जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मोरगाव तांडा येथील प्रकाश झामू चव्हाण या शेतकऱ्यासह चार भाऊ मिळून स्वत:ची व दुसऱ्यांची 11 एकर जमीन भाडे बटाईने करत होते; मात्र वेळेवर पाऊस न पडल्याने यंदा काहीच उत्पन्न आले नाही. तसेच शेतीसाठी प्रकाश चव्हाण याने दीड ते दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत प्रकाश चव्हाण हा काल (ता. 4) सायंकाळी घरून निघून गेला आणि शेतात विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज उघडकीस आली.