जनस्थान पुरस्काराचे सोमवारी वितरण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नाशिक - मराठीमधील स्त्रीवादी लेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांना यंदा जनस्थान पुरस्कार सोमवारी (ता. 27) सायंकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे प्रदान केला जाईल. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्त येथील महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या सोहळ्यात हा सन्मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते देण्यात येईल. 

प्रतिष्ठानतर्फे मराठी साहित्य क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार वर्षाआड प्रदान करण्यात येतो. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या सोहळ्याच्या जोडीलाच 10 मार्चपर्यंत कुसुमाग्रज स्मरण यात्रा होणार आहे. त्याअंतर्गत विविध आठ कार्यक्रम होतील.

Web Title: Janasthana prize distribution Monday