एक्‍स्प्रेस येण्याआधी रेल्वेगेट मध्ये अडकली बस..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

जळगाव - सकाळी आठची वेळ...सुरत रेल्वेगेट...नवजीवन एक्‍स्प्रेस येण्याची वेळ झालेली...एक्‍स्प्रेस येण्या आधी निघुन जाऊ...म्हणुन चालकाने बस रेल्वे रुळावर घातली... अन बस रेल्वेगेटमध्येच अडकली... प्रवाशांच्या हृदयाचे ठोके वाढले... अशा बिकट परिस्थितीत गेटमन धाऊन आला... त्याच्या प्रसंगावधानाने धडाडत येणारी एक्‍स्प्रेस गेटच्या दोनशेफुट आधी थांबली अन बसमधल्या प्रवाशांना जीवनदान देऊन गेली... ललीत गौतम असे गेटमनचे नाव आहे.

जळगाव-चोपडा (विदगावमार्गे) ही बस (एमएच-४०-एन-९८६४) आज सकाळी साडेआठच्या सुमारास गुजराल पेट्रोल पंपाकडून निमखेडी रस्त्याने चालक एस. पी. पाटील सुरत रेल्वे गेटपर्यंत आले. नवजीवन एक्‍स्प्रेस येणार असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेट बंद करण्यास सुरवात केली होती. मात्र बस चालक पाटील यांना वाटले बस निघून जाईल. त्यामुळे त्यांनी बसचा वेग वाढवला. रेल्वे कर्मचाऱ्यांना बस गेट पार करीत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी ओरडुन बस थांबविण्यास सांगितले. मात्र बस चालक पाटील यांनी त्यांचे ऐकले नाही. एका बाजुचे गेट पार झाले. बस अर्धी रुळावर असताना जिल्हा दूध संघाच्या बाजुच्या गेटमध्ये बसची कॅरीअर अडकली. त्यामुळे गेट तुटले. अन बस अर्धी रुळावर अर्धी गेटमध्ये अशी अडकली. प्रवाशांनी एकच गलका केला.

रेल्वे कर्मचाऱ्यांची समयसुचकता

सकाळी सव्वा नऊच्या सुमारास नवजीवन एक्‍स्प्रेस जाणार असल्याने गेटमन ललीत गौतम यांनी तीन मिनीटे अंगोदर गेट बंद केले होते. मात्र त्याचवेळी जळगाव-चोपडा ही बस रेल्वेरुळावर अडकली. घटनेनंतर ललित गौतम यांनी तत्काळ रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर विनयकुमार यांना फोनवरून घटनेचे गांभीर्य लक्षात आणुन दिले. त्यामुळे स्थानकावरून निघालेली नवजीवन एक्‍स्प्रेस गेटजवळून २०० मीटर अंतरावर येवुन थांबली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ललीत गौतम यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. या प्रकरणी रेल्वे पोलिसांत बस चालक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र

जळगाव : 'त्या आठही प्रवाशांचा जीव वाचवता आला असता, तर शौर्याचा आनंद साजरा केला असता..' अशा शब्दांत अमरनाथ यात्रेत दहशतवादी...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

जेलरोड (नाशिक) - "मातीच्या ढिगाऱ्याला कधी कोणी नमस्कार करतांना पाहिले आहे का?किंवा रस्त्यामध्ये पडलेली माती पायदळी तुडवली गेली...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नाशिक - ऋषिमुनींची तपोभूमी, सिद्धांची योगभूमी, फुलांच्या मुबलक आवकेमुळे गुलशनाबाद, यात्रेकरूंचं (पिलग्रीम), द्राक्ष (...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017