जिल्हाप्रमुख विजय करंजकर ठरले किंगमेकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

देवळाली कॅम्प - भगूर पालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचे "किंगमेकर' शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर ठरले. स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांचे बळ, तसेच भाऊ माजी नगरसेवक रंगनाथ करंजकर यांचे प्रचार काळातील योगदान पालिकेत शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवण्यात महत्त्वपूर्ण ठरले.

देवळाली कॅम्प - भगूर पालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचे "किंगमेकर' शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर ठरले. स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांचे बळ, तसेच भाऊ माजी नगरसेवक रंगनाथ करंजकर यांचे प्रचार काळातील योगदान पालिकेत शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवण्यात महत्त्वपूर्ण ठरले.

भगूर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. विजय करंजकर यांनी शिवसेना शहरप्रमुख असताना तरुणांचे संघटन केले. कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविल्या. अन्यायाला वाचा फोडणारे, तसेच प्रभावी वक्तृत्वामुळे तत्कालीन विरोधी सत्तेच्या काळात आपला दबदबा निर्माण केला. शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांची फौज तयार केली. पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवून 15 वर्षांपूर्वी शिवसेनेची सत्ता पालिकेत स्थापन केली. प्रबोधन मित्रमंडळाच्या माध्यमातून गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना मदत, आरोग्य शिबिरे आदी सामाजिक उपक्रम राबविले. 2001 मध्ये जनतेतून थेट नगराध्यक्षपदी निवड झाली. संघटनकौशल्य व प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे जिल्हाप्रमुखपदी निवड झाली.

भगूरच्या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली. कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवली. विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिले. दिवसरात्र प्रचाराचे नियोजन, कार्यकर्त्यांवर प्रचाराची व प्रभागाची जबाबदारी ठेवून त्याचा पाठपुरावा करून जेथे उणीव आहे तेथे स्वतः फिरून त्यांनी शिवसेनेचे भगवे वातावरण निर्माण केले. कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांना प्रचारासाठी नवे बळ देण्याचे कार्य विजय करंजकर यांनी केले. त्यांना त्यांचे मोठे भाऊ व माजी नगरसेवक रंगनाथ करंजकर, रोहिदास, तसेच पूर्ण करंजकर परिवार व कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिली.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - यंदाच्या हज यात्रेस गेलेल्या भारतीय मुस्लिम यात्रेकरूंकडून सौदी अरेबियात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा झाला....

02.00 AM

सोनगीर (जिल्हा धुळे): येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत गोंधळ अनावर झाल्याने ग्रामसभा मध्येच तहकूब करण्यात आली. याप्रकरणी ग्रामसभेचे...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

सोनगीर (जि. धुळे) : झोपडी जळून सर्वस्व खाक झाले. संसारोपयोगी भांडी, कपडे, अन्नधान्य, मुलांचे दप्तर एवढेच नव्हे तर रेशन कार्ड...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017