नाशिक: काटवन परिसरात बिबट्या आढळला मृतावस्थेत

leopard
leopard

अंबासन, नाशिक : तळवाडे भामेर येथील शंकर गायकवाड यांच्या पांढरी शिवारातील शेतात लागवड केलेल्या तुरीच्या बांधावर शुक्रवारी (ता.२०) भर दिवसा बिबट्या बांधांवर ग्रामस्थांना जखमी अवस्थेत दिसला होता. सायंकाळी वनविभागाचे आधिकारी दाखल झाले होते. बिबट्या तुरीमध्येच कर्मचा-यांना मृत झाल्याचे निदर्शनास आले आहे.

काटवन परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्याची दहशत असून आजही परिसरातील नागरिकांत भिंतीचे वातावरण पसरले आहे. दोन बिबट्याच्या झटापटीत एक बिबट्याला गंभीर दुखापत झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात दोन्ही बिबट्यांच्या डरकाळ्यांनी दणाणले होते. अचानकपणे डरकाळ्या बंद झाल्याने शुक्रवारी (ता.२०) ला दुपारी चार वाजेच्या सुमारास शंकर गायकवाड यांच्या पांढरी शिवारातील शेतातील तुरीच्या बांधांवर ग्रामस्थांना जखमी अवस्थेत बिबट्या बसलेला दिसला.

ग्रामस्थांनी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र आधिकारी निलेश कांबळे यांना घटनेची माहिती दिली होती. श्री. कांबळे यांनी त्वरीत आपल्या कर्मचा-यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पशुवैद्यकीय आधिका-यांनाही पाचारण करण्यात आले होते. बिबट्या तुरीच्या शेतात मृतावस्थेत आढळून आला. या परिसरात दुस-या बिबट्याने घुसखोरी केल्याने दोन्ही बिबट्याची झटापटीत एक बिबट्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे वनविभागाच्या आधिकारी व पशूवैद्यकीय आधिका-यांच्या निदर्शनास आले. मृत बिबट्याचा पंचनामा करून शवविच्छेदन केले. ग्रामस्थांनी व परिसरातील तरूणांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com