वीजचोरीतून दरवर्षी चार हजार कोटींचा फटका - संजीवकुमार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नाशिक - एकीकडे वर्षभरात चार हजार कोटी रुपयांची वीजचोरी; तर दुसरीकडे वितरित विजेच्या प्रत्येक युनिटचे बिलही वसूल होत नाही. महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली असून, परस्परांकडे बोट दाखविण्यापेक्षा सर्व कर्मचाऱ्यांनी टीमवर्कसाठी पुढे येण्याचे आवाहन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी केले.

एकलहरे प्रशिक्षण केंद्रात बैठक, तर नाशिकला वीज तांत्रिक कामगार संघटनेची वसुली कार्यशाळा झाली, त्या वेळी ते बोलत होते. नाशिक व नगर जिल्ह्यांतील वसुलीच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. कंपनीने खरेदी केलेल्या विजेचे पैसे 45 दिवसांत वीजनिर्मिती कंपनीला अदा करावे लागतात. ही मर्यादा ओलांडल्यानंतर थकीत रकमेवर 12.5 टक्के व्याज द्यावे लागते. "महावितरण'कडून "महाजनको' या एकाच वीजनिर्मिती कंपनीला सात हजार कोटींचे देणे बाकी आहे. हे चित्र बदलण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने वितरित विजेच्या प्रत्येक युनिटचा हिशेब लावून त्याचे बिल वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीतील सर्व घटकांनी प्रामाणिकपणे योगदान देण्याची आवश्‍यकता आहे. वसुलीत कामचुकारपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.